प्रतिनिधी : हर्ष नागवेकर.
रत्नागिरी : जितेंद्र आव्हाड यांनी भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा. सौ. चित्राताई वाघ यांची मानहानी आणि बदनामी केल्याबाबत कारवाईची मागणी केली आहे. समाजात महिला सबलीकरण करण्याचे तसेच सामाजिक, आर्थिक स्तरावर महिलांना सक्षम करण्याचे काम करत आहेत. जिथे-जिथे महिलांवर अन्याय होतो तिथे-तिथे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आवाज उठविला जातो पण सध्या भाजपा महिला प्रदेश मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांचे चरित्रहनन करण्याचा प्रकार राष्ट्रवादीचे मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड करत आहेत. हे पाहता एक महिला म्हणून आम्ही शांत बसू शकत नाही आव्हाड यांनी चित्रा वाघ यांच्या संदर्भात बदनामीकारक मजकूर ट्विटरवरून अपलोड केला आहे. चित्रा वाघ यांची मानहानी करण्याचा त्यांना बदनाम करण्याचा त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा आणि सामाजिक जीवनातून उठविण्याचा प्रकार जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून झाला आहे. जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रात महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले जात आहेत हे सहन केले जाणार नाही. म्हणूनच महिला नेत्या चित्रा वाघ यांची ट्विटर वरून बदनामी मानहानी केल्याप्रमाणे जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई व्हावी अशी मागणी शिल्पाताई मराठे प्रदेश चिटणीस भारतीय जनता पार्टी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्याकडे करण्यात आली आहे.
भाजप महिला मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्षा मा.सौ.चित्रा ताई वाघ यांची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्या संदर्भात आज भाजप महिला मोर्चा प्रदेश चिटणीस रत्नागिरी सौ. शिल्पा मराठे, तसेच महिला मोर्चा पदाधिकारी कार्यकर्त्या सौ.अंजली साळवी,सौ.वर्षा ढेकणे, सौ.रेशम तोडणकर, सौ.प्रणाली रायकर, सौ.उषा राजपूत, सौ.अपर्णा खरे यांनी पोलिक अधीक्षक श्री.धनंजय कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. दखल न्यूज महाराष्ट्र
