राशी भविष्य(२२ ऑक्टोबर २०२२)दैनिक राशीभविष्य

➡️ मेष : कोणत्याही कामात घाई करू नका. बाहेरील गोष्टीपेक्षा कुटुंबाकडे अधिक लक्ष द्या अति उत्साहीपणा घातक ठरू शकतो.
➡️ वृषभ : घरातील वरिष्ठांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. कौटुंबिक खर्च वाढू शकतात. तुमच्या वागण्यानुसार समोरच्याच्या मनात संशय निर्माण होईल असे वागू नका
➡️ मिथुन : कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. सर्व बाजू पडताळूनच निर्णय घ्या मेहनत शिवाय फळ मिळत नाही यशाला शॉर्टकट नाही. खरेदीसाठी खर्च होईल.
➡️ कर्क : तुमच्या कामात तुम्हाला यश नक्की मिळेल; पण कोणतेही काम करताना निष्काळजीपणा करू नका. जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होईल. तुम्हाला तुमच्या कार्यात अनेकांचे सहकार्य मिळेल.
➡️ सिंह : बाहेरील व्यक्तींचे अनुभव तुम्ही घेतले आहात पुन्हा एखादी चूक होणार नाही याकडे लक्ष द्या. जोडीदाराने दिलेला सल्ला ऐका, आजचा दिवस आनंदातच जाईल मित्र मंडळींबरोबर वेळ घालवाल तुम्ही केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम जाणवतील.
➡️ कन्या : आजचा दिवस तुमच्यासाठी कभी खुशी-कभी गम अशा स्वरूपाचा असणार आहे. काही गोष्टींमध्ये तुम्हाला आनंद मिळेल. तर काही घटनांमुळे ताण वाढू शकतो, पण तुम्ही विचलित होऊ नका. आपले विचार मनात पक्के ठेवा आणि त्यानुसार वाटचाल करत रहा.
➡️ तुला : आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करा, आरोग्य बिघडेल असे काही बाहेरचे खाऊ नका, त्यामुळे आजारांना पुन्हा निमंत्रण मिळेल. मित्रमंडळींना आज तुम्ही मदत कराल आज तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल. बोलताना कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या.
➡️वृश्चिक : आज कामधंद्यामध्ये तुमचा दिवस चांगला राहणार आहे. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपला जास्त वेळ जाईल. आज खरेदी कराल, तुमचे असणारी कर्ज फेडण्यासाठी आज आपण प्रयत्नशील असाल. तुमच्या बोलण्यातून इतरांना दिलासा मिळेल असे बोला.
➡️धनु: आज तुम्हाला कोणाकडून तरी काही भेटवस्तू मिळू शकते. एखादा कार्यक्रम करण्याचा विचार चालू असेल तर नक्की करा. वाहन चालवताना काळजी घ्या. काम करण्याची गती वाढवा.
➡️ मकर : तुम्ही घेतलेला एखादा निर्णय इतरांना मान्य असेल. आज घरातील कामांसाठी आपण व्यस्त रहाल, मानसिक शांतता आज तुम्हाला मिळेल महत्त्वाच्या कामांमध्ये मित्रांची मदत होईल.
➡️ कुंभ : तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी लाभ होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही उत्साहाने काम करत राहाल आध्यात्मिक गोष्टीत सहभागी व्हाल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून चांगले सहकार्य मिळेल, आजचा दिवस चांगला जाईल.
➡️ मीन : आज शांत वातावरणात जाऊन थांबण्यास आपले मन करेल. कौटुंबिक कामात अधिक उत्साहाने सहभागी व्हाल. दिवसाची सुरुवात काहीशी कठीण वाटली तरी दिवसाचा शेवट चांगला असेल कामातून आर्थिक लाभ होईल.       
▶️ *दखल न्यूज महाराष्ट्.*

जाहिरात..
Exit mobile version