ओणी नं ३ गोरुलेवाडी येथील शाळेत विद्यार्थ्यांना मोफत दफ्तर वाटप….

राजापूर – (प्रमोद तरळ) सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई या संस्थेच्यावतीने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा ओणी नं ३ गोरुलेवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना गुरुवार दि. १५ जून २०२३ रोजी मुख्याध्यापक मा. शिवराम गोतावडे यांच्या उपस्थितीत मोफत दप्तरांचे वाटप करण्यात आले
सदर शाळा सातवी पर्यंत असून विद्यार्थी पटसंख्या ३९ इतकी आहे. या शाळेत शिकत असलेली सर्व मुले आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत सदर शाळेला दफ्तर ( स्कूल किट )मिळवून देण्यासाठी रवींद्र रामचंद्र मासयेसर (ओझर) ग्रामस्थ विलास गोरुले, रामचंद्र गोरुले यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात..
Exit mobile version