रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्र असलेली बॅग प्रवाशाला केली परत..

वाहक सुशांत आंब्रे यांची कौतुकास्पद कामगिरी

चिपळूण (ओंकार रेळेकर) रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्र असलेली बॅग चिपळूण आगाराचे वाहक सुशांत आब्रे यांनी प्रवाशाला परत केली आहे. सुशांत आंब्रे यांच्या प्रामाणिक पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची विसरून एस.टी.बसमध्ये राहिलेली बॅग मालकाचा शोध घेऊन वाहक सुशांत आंब्रे यांनी त्यास परत केली. बॅगेत रोख रक्कम होती. आंब्रे यांच्या या प्रामाणिकपणाविषयी येथील आगार प्रशासनाकडून कौतुक होत आहे. शनिवारी येथील आगारातून सकाळी ८ वाजता चिपळूण-मुंबई सेंट्रल शिवशाही बसगाडी मुंबई सेंट्रल
निघाली. यावेळी प्रवास करणारे अरुण महाडिक हे ती बॅग या बसगाडीत विसरून मैत्री पार्क येथे उतरले.
बसगाडी मुंबई सेंट्रलला पोहचल्यानंतर वाहक आंब्रे यांना ही बॅग दिसली. त्यांनी तत्काळ बॅग मालकाचा शोध घेत महाडिक यांच्याशी संपर्क साधला. या बॅगेत औषधे, बँकेचे पासबुक व चेक बुक, रोख रक्कम, मोबाईल
चार्जर असे साहित्य होते. अखेर बॅग मालक मुंबई सेंट्रल येथे आल्यानंतर त्यांची बॅग त्यांना परत देण्यात आली.

फोटो : प्रवासी अरुण महाडिक यांना बस मध्ये विसरलेली त्यांची बॅग ताब्यात देताना वाहक सुशांत आंब्रे छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर) दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात…
Exit mobile version