शिक्षणात जिद्द ,चिकाटी ,मेहनत घेणारी मुले प्रगती करू शकतात : श्रीराम खरे

परशुराम नगर शिवसेना तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

चिपळूण (ओंकार रेळेकर) सत्काराने मुलांना नवी जगण्याची उमिद मिळते शिक्षणात मुले मुली चांगली प्रगती करू लागली आहेत.जिद्द, चिकाटी,मेहनत घेण्याची ताकत ज्यांच्या मध्ये असते तीच मुले शिक्षणात पुढे जाऊ शकतात असे प्रतिपादन नामवंत लोटे येथील उद्योजक तथा या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम खरे यांनी केले. परशुराम नगर मधील दहावी,बारावी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून श्री.खरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते .
चिपळूण शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील दहावी ,बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नवंकोकण एज्युकेशन सोसायटी चे उपाध्यक्ष व ज्येष्ठ शिवसैनिक तथा उद्योजक श्रीराम खरे यांच्या अध्यक्षतेखाली
रविवारी सकाळी डीबीजे महाविद्यालय सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या प्रभागाचे माजी नगरसेवक शशिकांत मोदी आणि परशुराम नगर शिवसेना यांच्या पुढाकाराने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेवक शशिकांत मोदी गेली चौदा वर्ष अखंडपणे या प्रभागाच्या वतीने मुलांचा गुणगौरव सोहळा आयोजित करीत आहेत.या सोहळ्याला उद्योजक श्रीराम खरे,कवी राष्ट्रपाल सावंत,प्राध्यापक श्री. राजरत्न दवणे यांनी प्रोत्साहन पर विशेष मार्गदर्शन केले. यावेळी प्रा.राजरत्न दवणे यांनी जिद्द किती महत्वाची आहे आणि परिस्थिती कशी ही असेल तरी इच्या शक्ती आपल्याला येशोशिखरावर नेते असे सांगत बोध पर गोष्टी ही सांगितल्या. यावेळी कवी राष्ट्रपाल सावंत यांनी कवितेतून शिक्षणाचे महत्व सांगितले. आणि मुलींनी आता धाडसाने मोठमोठी शिखर पार करावीत असे सुचविले.
नवकोकण एज्युकेशन सोसायटी चे संचालक नित्यानंद भागवत,माजी नगरसेविका जयश्री चितळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाची प्रस्तावना
शशिकांत मोदी यांनी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सोनाली खरचे यांनी केले. कौतुक सोहळ्यात दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थि आणि विशेष स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी मनोज पांचाळ, शक्ती चव्हाण ,बाळू मुळे, ज्ञानेश्वर नलावडे ,राम नलावडे, सिद्धेश चव्हाण ,गणेश शिंदे, आशिष कदम यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी भैय्या कदम, राणी महाडिक आदी उपस्थित होते.

फोटो : परशुराम नगर शिवसेना शाखेच्या वतीने गद्रे इंग्लिश मिडीयम स्कूल ची विद्यार्थिनी सायली ओंकार रेळेकर हीचा सत्कार करतांना उद्योजक श्रीराम खरे आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर) दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात..
Exit mobile version