▶️ अलिबाग -रायगड चे अप्पर कोषागार अधिकारी व लेखालिपीक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात……

प्रतिनिधी : अलिबाग रायगड चे अप्पर कोषागार अधिकारी रमेश सीताराम इंगळे वय वर्ष 57 व लेखालिपीक मनोज जाधव वय वर्ष 32 यांना 2000/ लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले
लाचेचे कारण वैद्यकीय कर्मचाऱ्याचे बिल मंजूर करण्यासाठी अप्पर कोषागार अधिकारी व त्याचा सह्ययक लेखालिपीक मनोज यांनी संगनमताने 2000/ रक्कम स्वीकारली ही कारवाई अलिबाग रायगडचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रणजित गलांडे ,सहाय्यक फौजदार अरुण करकरे ,विनीत जाधव कौस्तुभ मगर पोलीस हवालदार यांनी कारवाई केली
कोणत्याही सरकारी किंवा त्यांच्या खाजगी व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागा अलिबाग रायगड येथे संपर्क साधावा अशी विनंती पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांनी केले आहे दखल न्यूज महाराष्ट्र

Exit mobile version