बॅनर काढण्याचे आदेश कोणाचे..?
रत्नागिरी : रत्नागिरी शहर भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक सहा नाचणे पावर हाऊस या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे धन्यवाद मोदीजी आशयाचे बॅनर प्रभागातील कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले होते. हे बॅनर कोणी हटवले याबाबत परिसरामध्ये चर्चेला उधाण आले आहे.
नगर परिषदेच्या एका कर्मचाऱ्याने ते बॅनर काढून भाजपाच्या संबंधित कार्यकर्त्याच्या घरी नेऊन दिले मात्र हे बॅनर काढण्यास कोणी सांगितले असा प्रश्न केला असता त्याने शिवसेनेच्या (शिंदे गटाच्या) एका पदाधिकाऱ्यांचे नाव घेऊन त्यांनी हे काढायला सांगितल्याचे सांगितले आहे.

नाचणे पावर हाऊस या परिसरामध्ये रस्ता रुंदीकरण आणि गटाराचे काम सुरू आहे या परिसरामध्ये हे बॅनर लावले होते परंतु या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचा बॅनर काढायला सांगण्याचा अधिकार काय? असा सवाल भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्ष प्राजक्ता रुमडे यांनी केला आहे. लावण्यात आलेले बॅनर हे काढायचे असेल तर नगर परिषदेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसे सांगणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी असा कोणताही आदेश दिला नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. विनाकारण भारतीय जनता पार्टीचे बॅनर कोणत्याही कारणाशिवाय कोणी हटवत असेल तर हे चुकीचे आहे. प्रशासनाचे काम करण्याचा कोणत्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने ठेका घेतला आहे का.? आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी सुरू केलेल्या लोकाभिमुख योजना लोकांपर्यंत पोहोचाव्या या उद्देशाने मोदीजींना धन्यवाद देणारे बॅनर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात येतात. असे बॅनर कारणाशिवाय काढून टाकून काय मिळाले? असा सवाल भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष प्राजक्ता रूमडे यांनी केला आहे. भाजपाचे सर्व पदाधिकारी प्रत्येक गोष्टीमध्ये शिंदे गटास सहकार्य करत असताना अशा प्रकारे नाहक कारणाशिवाय कोणी आमचे बॅनर काढून टाकणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही असे प्राजक्ता रूमडे यांनी म्हंटले आहे..
दखल न्यूज महाराष्ट्र.