श्रमिक मित्र सहकरी क्रेडिट संस्था मर्यादित या संस्थेच्या कार्यकारिणी समितीची बिनविरोध निवड.

मुंबई – (प्रमोद तरळ) श्रमिक मित्र सहकारी क्रेडिट संस्था मर्यादित, कांदिवली (प.) या संस्थेच्या कार्यकारिणी समिती पदी सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी सर्वश्री राजेंद्र निकम अध्यक्ष, विठोबा लाड उपाध्यक्ष, दत्ताराम नाईक सचिव, तसेच सभासद म्हणून अजित पाटील, रामचंद्र तांबे, सुधाकर कदम, सौ. सुमेधा देसाई व सौ. भारती सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सदर संस्थेची स्थापना १९९४- ९५ या साली झाली असून सध्या या संस्थेचे ८०० पेक्षा जास्त सभासद आहेत. समाजातील सर्व थरातील श्रमिक, गोरगरीब व गरजू सभासदांना कमीत कमी व्याज दरात कर्ज मिळावे म्हणून या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. फक्त नफा कमविणे हा उद्देश न ठेवता गोरगरीब, गरजू, श्रमिक सभासदांच्या आर्थिक अडचणीच्या वेळी सहाय्य करून सदर संस्था आपले धेय्य पार पाडत आहे.
अनेक संस्थांमधून अटीतटीच्या निवडणुका व त्यासाठी वारेमाप खर्च होत असताना वरील संस्थेने कार्यकारिणी समिती बिनविरोध गठीत करून सहकार क्षेत्रात एक आदर्श घालून दिल्या बद्दल सर्व स्तरातून श्रमिक मित्र सहकारी पतसंस्थेचे कौतुक होत आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version