रत्नागिरी : लांजा शहरातील स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने दि 23 ऑक्टोबर सायंकाळी 4 वाजता पावस येथे अनुसया आनंदी वृद्धाश्रमात संगीत संध्या या मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक जेष्ठ समाजसेवक ऋषीनाथ दादा पत्याने यांच्या संकल्पनेतून दरवर्षी दिवाळी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन यानिमित्त करण्यात येते.

“Grow Up” Creche.
लहान मुलांना सांभाळण्यासाठीचे केंद्र.
उद्या रविवारच्या कार्यक्रमाच्यावेळी वृद्धांसाठी फराळ भेटवस्तु मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक खानविलकर ,संगीत सह्याद्री चे संस्थापक जेष्ठ गायक यासीन हमीद, जेष्ठ गायक राकेश मोरे ,रंगभूषाकार नरेश पांचाळ ,सर्वता चव्हाण ,स्नेहा शिवलकर यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी अभिनेत्री पूजा सावंत पार पाडणार आहेत. तरी लोकांनी या संगीत कार्यक्रमास आवश्य यावे असे विनायक खानविलकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र
.