देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात विशेष शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी केला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, प्रा. विकास शृंगारे, ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, प्रा. धनंजय दळवी, प्रा. डॉ. प्रशांत नारगुडे यांच्यासह इतर प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी सर्व यशस्वी गुणवंतांचे विशेष कौतुक करताना त्यांच्या यशाचा आढावा घेतला. सर्व गुणवंत विद्यार्थी व कर्मचारी यांची शैक्षणिक कामगिरी संस्था व महाविद्यालयासाठी भूषणावह असल्याचे याप्रसंगी नमूद केले. विशेष शैक्षणिक गुणवत्तेसाठी सन्मानित करण्यात आलेल्यांमध्ये ग्रंथालयातील सहाय्यक कर्मचारी रोशन राजाराम गोरुले यांनी ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी प्राप्त केल्याबद्दल गौरविण्यात आले. तर प्रा. संदीप सुरेश मुळ्ये यानी योगशास्त्र या विषयात एम. ए. पदवी आऊटस्टँडिंग ग्रेडमध्ये प्राप्त केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांनी आयोजित केलेल्या सेट परीक्षेत यशस्वी झालेल्या प्रा. अजिंक्य श्रीकृष्ण नाफडे (कॉम्प्युटर सायन्स अँड एप्लीकेशन), प्रा. गायत्री माधव जोशी (मॅथेमॅटिकल सायन्स), तर माजी विद्यार्थी महेश रमेश झोरे (पॉलिटिकल सायन्स), हर्षदा सुनील लिंगायत (सोशॉलॉजी), सई अजित जाधव (जिओलॉजी) यांना सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक गुणवंत माजी विद्यार्थी व कर्मचारी यांच्या यशाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, राजेंद्र राजवाडे यांनी अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
फोटो- प्रा. गायत्री जोशी यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. पाटील, ग्रंथपाल प्रा. मायंगडे, प्रा. दळवी.
छाया- चैतन्य भागवत. दखल न्यूज महाराष्ट्र
