MSEB ने दिली नुकसानग्रस्त शेतकरी रामचंद्र कृष्णा शिंदे यांना ५० हजार दिली तातडीची मदत आणि केली ६ लाख मदत मंजूर..

मनसे खेड तालुका अध्यक्ष संदीप फडकले यांनी मानले आभार….

खेड – (प्रमोद तरळ) दि. १८ जुलै २०२३ रोजी शेतकरी रामचंद्र कृष्णा शिंदे यांच्या चार म्हशी करंट लागून मृत्युमुखी पडल्या होत्या.सदर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पाहनी केल्यानंतर, mseb, मुख्य ऑफिसर शिवतरे यांनी मदत देऊ असा शब्द दिला होता.शेतकऱ्याला योग्य ते न्याय देऊ दिलेल्या शब्द शिवतरे यांनी पाळला त्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संबंधित अधिकाऱ्यांचे खरोखर आभार मानले.यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष श्री संदीप जी फडकले, mseb, officer शिवतरेजी व नानावटेजी, मनसे पदाधिकारी,मा.सचिव कृष्णा शेलार,सुनील शिंदेभरत भेकरे, रोशन गुजर,सवेणी शाखाध्यक्ष नदीम तळवलकर, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.शेतकरी रामचंद्र कृष्णा शिंदे व सौ शिंदे ताई यांना तातडीची मदत म्हणून ५००००/-पन्नास हजार रुपये देण्यात आले.रुपये 6,00,000/-सहा लाख रुपयाचा पंचनामा केला.एक महिन्याच्या पैसे देऊ असे mseb चे ऑफिसर शिवतरे आणि नानावटे साहेबांनी शब्द दिला. त्याचप्रमाणे नादुरुस्त झालेले पोल येत्या दोन दिवसात बदलून देतो.त्यामुळे मनसेचे तालुकाध्यक्ष संदीप जी फडकले साहेब यांचे शेतकरी रामचंद्र कृष्णा शिंदर यांनी मानले आभार मानले. दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात…
Exit mobile version