संगमेश्वर : काल युवासेना संगमेश्वर उपतालुका प्रमुख सुधिर चाळके यांनी परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्याकडे गांभीर्याने लक्ष वेधत एडिशनल एस पी जयश्री पाटील मॅडम आणि संगमेश्वर पोलीस निरीक्षक गावित साहेब यांना निवेदन दिले त्या निवेदनात त्यांनी असं म्हटलं आहे की
डिंगणी गावं आणि इतर पंचक्रोशी गावातील किंबहुना संगमेश्वर तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये परप्रांतीय व्यवसाय करीत आहेत. व्यवसाय करण्यासाठी त्यांना आमच्या मराठी लोकांकडून कोणताही त्रास नाही किंवा आक्षेप नाही पन दरम्यान च्या काळात परप्रांतीयांचा सुळसुळाट एवढा झाला आहे की गावातील अशिक्षित लोकांना आणि वयस्कर लोकांना गंडवण्याचे प्रकार चालले आहेत.तसेच परराज्यात गुन्हा करून इकडे गावात वावरत असतात म्हणुन प्रत्येक गावातील बिट पोलीस स्टेशनं ला या परप्रांतीयांच्या नोंदी असाव्यात.तसेच शक्य झाल्यास त्यांना पोलीस कार्ड देन्याय यावं जेणेकरून एखादी चुकीची घटना घडली असता आपणास देखील योग्य तपास करण्यास मदत होईल.
हे निवेदन उपजिल्हा प्रमुख राजेशजी मुकादम. तालुका प्रमुख प्रमोदजी पवार. आणि खाडी विभाग प्रमुख महेशजी देसाई यांच्या मार्गदर्शनाने देण्यात आले.त्या प्रसंगी उपतालुका प्रमुख जमृत भाई अलजी. तैमूर अलजी. आणि युवासेना विभाग प्रमुख प्रथमेश साळवी उपस्थित होते. निवेदन मिळताच एडिशनल एस पी जयश्री पाटील मॅडम यांनी अंमलबजावणी करण्याचे पोलीस स्टेशनला आदेश दिले.
दखल न्यूज महाराष्ट्र.
