मौजे मुसलोंडी ग्रामविकास मंडळाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न..

विरार – (प्रमोद तरळ) चिपळूण तालुक्यातील मौजे मुसलोंडी ग्रामविकास मंडळ (खार) मुंबई, (रजि) हे मंडळ गेली ४२ वर्षे गावातील एकोपा अबाधित रहावा यासाठी प्रयत्नशील आहे मुसलोंडी हे गाव अतिशय दुर्गम भागात वसलेले दुर्लक्षित असे गाव आहे गावातील मुलांनी शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करावी. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावे या हेतूने मंडळ सदैव कार्यतत्पर असते
यंदाही रविवार दि. ४ सप्टेंबर २०२३ रोजी विरार पश्चिम येथील आप्पासाहेब वर्तक सभागृहात मौजे मुसलोंडी ग्रामविकास मंडळ (खार ) मुंबई यांच्या वतीने भविष्यात विद्यार्थ्यांनी आव्हानात्मक स्पर्धा परीक्षांना कसे सामोरे जावे सरकारी नोकरी मिळवून आपल्या मौजे मुसलोंडी गावाचे नांव उज्ज्वल करावे यासाठी स्पर्धा परीक्षेत यश कसे संपादन करायचे आणि कोणत्या शैक्षणिक पास विद्यार्थी- विद्यार्थीनीनी कोणता कोर्स, कोणती परीक्षा द्यायची, पोलीस दल, भारतीय आर्मी , बॅंकीग क्षेत्रात कसे पुढे जाता येईल याबाबत तज्ञ, महान अनुभव असलेले मार्गदर्शक मा. श्री. सत्यवानजी रेडकर यांना आमंत्रित केले होते. मा. सत्यवानजी रेडकर यांनी फारच अनमोल असे मार्गदर्शन करून मुला – मुलींना स्टेजवर बोलावून त्यांचे मनोगत जाणून घेतल्यावर त्या मुलाने कोणत्या क्षेत्रात कोणती परीक्षा द्यायची याचे मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित विद्यार्थी व ग्रामस्थ त्यांच्या अचूक मार्गदर्शनाने मंत्रमुग्ध झाले आणि मौजे मुसलोंडी गावकऱ्यांनी आपल्या मुलाना सरकारी नोकरीत उच्च पदावर पोहचविण्याचा निश्चय केला शेवटी सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात…
Exit mobile version