कुणबी समाज सेवा मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न..

मुंबई – (प्रमोद तरळ ) कुणबी समाज सेवा मंडळ (रजि.) आडिवरे, कशेळी,गावखडी संलग्न आजी- माजी कुणबी विद्यार्थी संघटना यांची १९ वी सर्वसाधारण सभा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवार दि. ३ सप्टेंबर २०२३ रोजी दु. ३.३० वा. राजे शिवाजी विद्यालय, हिंदू काॅलनी दादर येथे मंडळाचे अध्यक्ष श्री प्रभाकर तुकाराम वारीक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली
‌सदर सभेत वार्षिक अहवाल, जमा – खर्च संमत करण्यात आला. त्याचबरोबर शालेय, विद्यार्थ्यांना पारितोषिक आणि प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले. सभेत सर्वश्री प्रभाकर वारीक, विद्यमान अध्यक्ष, श्री प्रदीप शृंगारे, प्रमुख कार्यवाह सर्वश्री उपाध्यक्ष रवि थारली आणि सुभाष गोराठे, संजय वारीक,‌ खजिनदार, श्री गणेश शृंगारे, सहकार्यवाह, माजी अध्यक्ष, विद्यमान सल्लागार आणि कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे सरचिटणीस श्री अरविंद डाफले साहेब, माजी अध्यक्ष आणि विद्यमान सल्लागार शंकर वारीक, अनंत बाने, वास्तू समिती अध्यक्ष अनिल जुवळे. शिवाय आजी – माजी कुणबी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते. मान्यवरांनी समाजातील बांधवांच्या समस्यांवर मार्गदर्शन केले. ग्रामीण भागात नियोजीलेल्या समाज मंदिराचे ( इमारत) काम हाती घेण्याचे नक्की करण्यात आले. मंडळात विवाह समिती गठण करण्यात आली. उपस्थीत बांधवांनी अनेक विषयावर चर्चा, मार्गदर्शन केले. अशा खेळी मेलीच्या वातावरणात सभा संपन्न झाली. दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..
Exit mobile version