राजापूर – (प्रमोद तरळ) तालुक्यातील मौजे पाचल गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी पाचल कोंडवाडी येथील मंगेश श्रीपत भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली आहे
श्री भोसले हे केदारलिंग मित्र मंडळाचे अध्यक्ष असून गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत गावच्या विकासासाठी सातत्याने धडपडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते पाचल गावचे सरपंच बाबालाल फरास तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली श्री मंगेश भोसले यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून श्री केदारलिंग मित्र मंडळ,गोरुलेवाडी मुंबई यांनी त्यांचे जाहीर अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दखल न्यूज महाराष्ट्र.
