कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आयोजित व्यवसायिक प्रदर्शन आणि विक्री महोत्सवास उस्फूर्त प्रतिसाद ….

विरार – (प्रमोद तरळ) कुणबी समाजातील व्यवसायिक बांधवांना संघटित करून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरू केलेली संस्था म्हणजेच, ‘कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ या संस्थे मार्फत रविवार दिनांक १० सप्टेंबर , २०२३ रोजी सेंट अँथोनी हायस्कूल , नगिनदास पाडा , मोरेगाव , नालासोपारा ( पूर्व ) येथे आयोजित केलेल्या व्यवसायिकांना साहित्याचे प्रदर्शन आणि विक्री महोत्सव २०२३ परिसरातील समाज बांधवांनी आणि नागरिकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला . गणेश उत्सवाचे औचित्य साधून परिसरातील बांधवांना एकच व्यापिठावर आणून कोकणात गणेश उत्सवासाठी जाणाऱ्या बांधवांना वाजवी दरात सर्व साहित्य उपलब्ध केल्याने उत्सवाचे वातावरण महोत्सवात निर्माण झाले होते . व्यवसायिक आणि खरेदी करणारे बांधवांचे समाधान हेच संस्थेच्या प्रदर्शन आणि विक्री महोत्सवाचे यश आहे . ‘एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत’, या संस्थेच्या ब्रीद वाक्याप्रमाणेच, संस्थापक श्री अशोकजी वालम व अध्यक्ष श्री प्रेमनाथजी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर जोमाने कार्य करीत आहे. ११०० छोट्या- मोठ्या उद्योजकांना साथीला घेऊन, सुरू झालेल्या संस्थेने, आज २००० उद्योजकांचा टप्पा पार करत आहे. भविष्यात हा आकडा ५,००० चा टप्पा पूर्ण करेल, असा अध्यक्षांना ठाम विश्वास आहे.
दि. ९ जुलै २०२३ रोजी, दादर येथे आयोजित केलेल्या व्यावसायिकांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री सोहळ्यास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. हीच शृंखला पुढे नेताना रविवार दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी, नालासोपारा येथे येथे द्वितीय व्यावसायिक प्रदर्शन व विक्री सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात जवळपास १०० उद्योजकांनी सहभाग घेतला. अपुऱ्या जागेमुळे कित्येक उद्योजकांना, आम्हाला यात सहभागी करून घेता आले नाही, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करण्यात आली परंतु संस्थेला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे आणि समाजबांधवांच्या मागणी नुसार संस्था भविष्यात मोठ्या व्यवसायिक बाजारपेठ विविध ठिकाणी उपलब्ध करुन व्यवसायिकांना मोठी चालना देण्याचे काम लवकरच सुरू करणार आहे . या महोत्सवात समाजाचे प्रचारक म्हणून श्री . दीपक मांडवकर आणि श्री . मंगेश घडवले हे आवर्जून उपस्थित होते . या प्रदर्शनाला जवळपास तीन हजाराहून अधिक समजबांधांनी , नागरिकांनी भेट दिली. व्यावसायिकांनी तसेच या कार्यक्रमास भेट देणाऱ्यांनी, असे कार्यक्रम येथे वारंवार व्हावेेत, अशा सूचना दिल्या. यावर नक्कीच विचार केला जाईल, असे आश्वासन अध्यक्षांच्या वतीने देण्यात आले.
‌ या कार्यक्रमासाठी कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या सर्व पदाधिकारी, सदस्य, संपर्क कमिटी पदाधिकारी, सदस्य यांनी फार मेहनत घेतली. विशेष म्हणजे स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व सदस्य रघुनाथ कळभाटे, प्रकश भोस्तेकर , पंकज पालकर, सूनिल माळी, दत्ताराम घाणेकर, अनंत फिलसे, ,आनंद राणे तसेच श्री . श्रीधर कदम यांनी अहोरात्र झोकून देऊन काम केले,,सोशल मीडिया प्रसिद्धी विकास बटावले, अजित गोरूले, मयूर रहाटे, हेमंत रामाणे यामुळेच हा कार्यक्रम संपूर्णपणे यशस्वी झाला. या महोत्सवाच्या नियोजनाची जबाबदारी श्री . प्रकाश तुकाराम भोस्तेकर यांनी समर्थपणे पार पाडली . तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यानी आपले अमूल्य योगदान देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात महत्वाचे योगदान दिले .या महोत्सवात स्थानिक तसेच कोकण , ठाणे , पुणे या परिसरातील कुणबी व्यवसायिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता . पदाधिकारी, व्यावसायिक व जमलेल्या बांधवांचे आभार प्रकट करताना, असेच सहकार्य वेळोवेळी, प्रत्येक ठिकाणी मिळो अशी अपेक्षा संस्थेने व्यक्त केली . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजाचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले नाटककार , टिव्ही स्टार , दिग्दर्शक आणि समाजावर प्रचंड प्रेम असलेले श्री . सुनील माळी यांनी दिवसभर अत्यंत उत्कृष्टपणे केले . कुणबी समाज बांधवांच्या आर्थिक आणि व्यवसायिक प्रगतीसाठी संस्थापक श्री . अशोकदादा वालम यांनी यांनी सर्व सहकाऱ्यांना जवळ करून ही संस्था स्थापन केली . आज मुंबई , मुंबई उपनगर , ठाणे , शहापूर , पुणे , कोकण परिसरातून अनेक बांधव या संस्थेचे सभासद होत असून संस्था राबवित असलेल्या उपक्रमाला उत्सुर्त प्रतिसाद देत आहेत . दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात….
Exit mobile version