युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण मध्ये मेरी मिट्टी मेरा देश उपक्रम संपन्न.

चिपळूण (ओंकार रेळेकर)परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण मध्ये मेरी मिट्टी मेरा देश हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये आलेले प्रमुख अतिथी यांचे स्वागत लेझीम पथकाने करण्यात आले. भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सौ. प्रज्ञाताई ढवण आणि सिंधुदुर्ग माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा ओबीसी महिला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सौ दीपलक्ष्मी पडते , माजी नगराध्यक्षा सौ सुरेखा खेराडे अन्य भाजप पदाधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

जाहिरात…

त्यांचे स्वागत प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ स्वप्नाली पाटील , उपमुख्याध्यापक श्री संजय बनसोडे पर्यवेक्षक श्री संदीप मुंढेकर यांनी केले तसेच त्यांच्या समवेत आलेली चिपळूणचे भाजप पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले सुरुवातीला कलश पूजन हा कार्यक्रम करण्यात आला प्रशालेतील सर्व अधिकारी वर्ग, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी ,एनसीसी विद्यार्थी प्रशालेतील विद्यार्थी -विद्यार्थिनी यांनी या कलशा मध्ये परशुराम भूमीतील माती दिल्ली येथे अमृत वाटिका येथे पाठवण्यासाठी एकत्र करण्यात आली.या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्याच्या मनामध्ये देश प्रेम ,आनंदाचे वातावरण निर्माण झाले .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान लाभले.

फोटो : युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण मध्ये मेरी मिट्टी मेरा देश उपक्रम राबविणे कार्यक्रमात शिक्षक प्रतिनिधींचे स्वागत करतांना सुरेखा खेराडे आणि कार्यकर्ते छायाचित्रात दिसत आहे(छाया : ओंकार रेळेकर). दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात…
Exit mobile version