चिपळूण (ओंकार रेळेकर) मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत चिपळूण मध्ये माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या नेतृत्वाखाली अभियान गुरुवारी
यशस्वी झाले आहे. यात महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभियानात सहभाग घेतला.

देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सुरु असलेल्या मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आणि भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सौ.चित्राताई वाघ यांच्या सूचनेनुसार अभियान राबविण्यात आले.आज चिपळूण येथे भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ.प्रज्ञाताई ढवण आणि सिंधुदुर्ग माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा ओबीसी महिला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षा सौ.दिपलक्ष्मी पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील परशुराम एज्युकेशन सोसायटीचे युनायटेड इंग्लिश स्कूल, प्रेमजीभाई असर प्राथमिक शाळा आणि गद्रे न्यू इंग्लिश स्कूल , डीबीजे कॉलेज , खेर्डी येथे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि आणि विद्यार्थी आणि खेर्डी येथील महिला बचत गटयांच्या समवेत मेरी माटी मेरा देश उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये युनायटेड इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौं. स्वाती पाटील, प्रेमजीभाई असर प्राथमिक शाळेच्या सो नाईक, गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलच्या सिईओ सौ.पल्लवी सारोळकर , डीबीजे कॉलेज चे बाबूशेठ तांबे , खेर्डी येथे श्री विनोद जी भूरण यांच्या समवेत विद्यार्थी आणि शिक्षक यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. हे उपक्रम सुरू असतानाच आदरणीय मोदीजींचे घर चलो अभियान हेही यावेळी राबवून जवळपास ८० कुटुंबांशी संपर्क साधण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे, चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, चिपळूण शहराध्यक्ष आशिष खातू, रसिका देवळेकर शीतल रानडे सचिन शिंदे, मंदार कदम, विनायक वरवडेकर शैलेश लब्दे, साहिल ताम्हणकर आदी उपस्थित होते.
फोटो : मेरी माटी मेरा देशया उपक्रमांतर्गत चिपळूण मध्ये
डीबीजे महाविद्यालयात अभियान ची माहिती देताना भाजपा पदाधिकारी छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर). दखल न्यूज महाराष्ट्र