खेड तालुक्यातील मांडवे कोसमवाडी येथे विहीर कोसळली; ग्रामस्थांना शासनाकडून मदतीची अपेक्षा.

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मांडवे कोसमवाडी येथे काल पाण्याची विहीर कोसळल्याने तेथील रहिवासी यांच्यावरती पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहिले आहे.
बुधवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता मांडवे कोसमवाडी येथील वाडीतील विहीर कोसळली आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी यांच्यासाठी या विहिरीच्या माध्यमातून पाण्याची सोय करण्यात आली होती आणि ही विहीर कोसळल्यामुळे नागरिकांवरती पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहिले आहे. साधारणपणे शेकडो लोक या विहिरी वरती अवलंबून होते ही विहीर बांधण्यासाठी साधारणपणे सहा लाख रुपये खर्च येणार आहे मातीची जमीन असल्यामुळे ही विहीर खालपासून बांधावी लागणार आहे. ही विहीर कोसळल्याने ग्रामस्थांना साधारणपणे दीड किलोमीटर पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. तरी प्रशासनाच्या वतीने याबाबत आम्हाला मदत मिळावी अशी मागणी तेथील स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे. अशी माहिती मंगेश जाधव यांनी दिली.
दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात
Exit mobile version