नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपची अवयवदान जनजागृती..

भाजप कार्यकर्त्यांनीदेखील केले अवयवदान

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपच्या वतीने आज दि.१७ सप्टेंबर रोजी अवयवदान जनजागृती मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी भाजप कार्यकर्त्यांनी देखील अवयवदान संकल्प केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचा पंधरवडा हा भाजपकडून ‘सेवा पंधरवडा’ म्हणून साजरा केला जातो. त्या अंतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालयात झालेल्या या मोहिमेच्या वेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि उपाध्यक्ष प्रशांत डिंगणकर यांनी अवयवदानाचे महत्व विशद केले आणि अधिकाधिक लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. या वेळी भाजपचे पंचायत समिती सदस्य सुशांत पाटकर, जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, युवा मोर्चा प्रदेश सचिव विक्रम जैन, शहर सरचिटणीस दादा ढेकणे,अनिरुद्ध फळणीकर, धनंजय पाथरे, अशोक वाडेकर, पल्लवी पाटील यांनी देहदान करण्याचा संकल्प करून नोंदणी केली. या कार्यकर्त्यांचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी गुलाबापुष्प देऊन अभिनंदन केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, उपाध्यक्ष प्रशांत डिंगणकर, चिटणीस राजू भटलेकर, शहर उपाध्यक्ष नितीन जाधव, डॉ. ऋषिकेश केळकर, ययाती शिवलकर उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात
Exit mobile version