कल्पना कॉलेज लांजा मध्ये मोदक प्रदर्शनाचे आयोजन..

प्रतिनिधी : सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची लगबग दिसतेय, कोकणात घराघरात गणपती आणायची परंपरा आणि कोकणी माणूस आणि गणपती यांच्या नात्याबद्दल वेगळं सांगायची गरज नाही. याच गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कल्पना कॉलेज मध्ये दरवर्षी मोदक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.

जाहिरात..


यावर्षी 25 पेक्षा आधिक कमी जिन्नस व कमी खर्चात बनणाऱ्या मोदकांचे प्रकार हॉटेल मॅनेजमेंट च्या विद्यार्थ्यांनी बनवुन प्रदर्शनात ठेवले होते.
यामध्ये गव्हाचे पीठ, नारळ, मावा, दूध, दूध पावडर, खजूर, विविध ड्रायफ्रूट वापरून विविध मोदक विद्यार्थ्यांनी तयार केले होते. नेहमी बनविल्या जाणाऱ्या उकडीच्या मोडकांसह या विविध प्रकारच्या मोदक पाहून उपस्थित सर्वांनी कौतुक केले.या सोबतच जुन्या कापडांपासून बनविलेल्या पर्स, पाऊच, व बॅग फॅशन डिझायनिंग च्या विद्यार्थिनींनी प्रदर्शनात मांडल्या होत्या. यामध्ये समोसा, स्टेशनरी पाऊच, मिनी पर्सेस, हँड बॅग असे विविध प्रकार विद्यार्थ्यांनी तयार केले होते.

दखल न्यूज महाराष्ट्र

Exit mobile version