भाजपा शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष यांच्या नियुक्ती जाहीर.

रत्नागिरी तालुक्यात 2 अध्यक्ष, तर रत्नागिरी शहर, लांजा, राजापूर, संगमेश्वरच्या  नियुक्त्या.

प्रतिनिधी : रत्नागिरी..

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण रत्नागिरीच्या मंडळ अध्यक्षांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी घोषित केली आहे. काही दिवसापूर्वी जिल्हा नियुक्ती जाहीर होताच. रत्नागिरी शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे.

जाहिरात


           त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यासाठी रत्नागिरी शहर, रत्नागिरी दक्षिण आणि रत्नागिरी उत्तर अशा तीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी शहर ची जबाबदारी राजन फाळके यांच्यावर देण्यात आली तर रत्नागिरी दक्षिण ची जबाबदारी संयोग उर्फ दादा दळी आणि रत्नागिरी उत्तर साठी विवेक सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
            रत्नागिरी शिवाय संगमेश्वर दक्षिण मंडळ अध्यक्ष म्हणून रुपेश कदम, लांजा मंडळ अध्यक्षपदी चंद्रकांत मांडवकर, तर राजापूर पूर्व मंडळ अध्यक्षपदी भास्कर सुतार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
           भारतीय जनता पक्षांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. सर्व नियुक्ती जाहीर होताच नवीन पदाधिकाऱ्यांवरती अभिनंदन आता वर्षाव होत आहे.

दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..
Exit mobile version