राज्याचे लोकप्रिय सार्वजनिक बांधकाममंत्री नामदार श्री. रवींद्र भाई चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुका अध्यक्ष विवेक सुर्वे यांनी घेतले मोफत नेत्र तपासणी शिबिर.

रत्नागिरी : दि. २०/०९/२०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय सार्वजनिक बांधकाममंत्री नामदार श्री. रवींद्र भाई चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नूतन भाजपा तालुका अध्यक्ष श्री. विवेकजी सुर्वे रत्नागिरी(उत्तर) यांनी रत्नागिरी तालुका भाजप आणि लायन्स क्लब रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्या सूचनेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वाटद केले होते.

जाहिरात..

या तपासणी शिबिराला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. तपासणी शिबिराचा लाभ परिसरातील सुमारे २०० बंधू भगिनींनी घेतला. १३० गरजूंना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले आणि ३५ जणांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे नियोजन गणपती उत्सवा नंतर करण्यात आले आहे. गेल्या वर्षी रक्तदान शिबिर या वर्षी मोफत  नेत्रा तपासणी शिबिर अश्या या समाज उपयोगी उपक्रमांमुळे समाजाच्या सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अश्याच लोकाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन यापुढेही तालुका भाजपा  मार्फत होत राहील अशी प्रतिक्रिया मा. विवेक जी सुर्वे  यांनी दिली.
दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात…
Exit mobile version