निवळी ग्रामपंचायत च्या वतीने आयुष्यमान भारतचा कॅम्प यशस्वी.

रत्नागिरी : निवळी ग्रामपंचायतच्या वतीने आयुष्यमान भारतचा कॅम्प निवळी येथे लावण्यात आला होता त्यावेळी उपसरपंच श्री संजय निवळकर, ग्रामसेवक पाचवे, सीएचओ खंडागळे, आशाताई शिंदे , सुविधा रावणंग, मेघा रावणंग, आरोग्य सेवक विश्वनंद साळवी हे सर्व उपस्थित होते.
या शिबिराचा लाभ असंख्य ग्रामस्थांनी घेतला. सदर शिबिराला 94 लोकांचे केवायसी झाल्या आणि त्यांना आयुष्यमान भारतचे कार्ड मिळाले. शासनाच्या वतीने विविध योजनांचा लाभ बहुसंख्येने घ्यावा असे उपसरपंच संजय निवळकर यांनी म्हटले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात…
Exit mobile version