चिपळूण (ओंकार रेळेकर) सय्यदवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते महामुद हसन सय्यद यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभाग रत्नागिरी जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांच्या सुचनेनूसार जिल्हाध्यक्ष जुबेर काझी यांनी ही निवड केली. चिपळूण ते नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा जिल्हा मेळावा झाला. त्यात माजीमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते महामुद सय्यद यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी माजी आमदार रमेश कदम, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर साहेब, चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. चित्रा चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. महामुद सय्यद यांना सामाजिक कामाची आवड आहे. ते पोफळी गावच्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष होते. जनसेवा संघाचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांची निवड करण्यात आली. जिल्ह्यातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मी पदाला योग्य ते न्याय देत शरद पवार यांचा पक्ष बांधण्यासाठी प्रयत्न करीन. अशी ग्वाही महामूद सय्यद यांनी दिली. जनसेवा संघाचे जिल्हा प्रभारी ताहीर खान, पोफळी गावातील हसमत खान, युसुफ सय्यद, मुबारक सय्यद, समीर खान, मुस्ताक सय्यद, शहजाद खान, मलीक सय्यद, मजीद सय्यद, परवेज सय्यद आदींनी त्यांचे अभिनंदन केले. दखल न्यूज महाराष्ट्र.
- Home
- चिपळूण – राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक सेलच्या जिल्हा सचिवपदी महामूद सय्यद यांची निवड.
चिपळूण – राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक सेलच्या जिल्हा सचिवपदी महामूद सय्यद यांची निवड.
-
by saurabhsalvi26 - 108
- 0

Leave a Comment
Related Content
-
महाराष्ट्रातील देवाभाऊंसाठी भव्य व उत्कृष्ट राखी प्रदान सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्याचा नाव लौकिक.
By Nilesh Akhade 2 weeks ago -
ईगल तायक्वांदोच्या शिवाज्ञा पवार हिचा सत्कार..
By Nilesh Akhade 4 weeks ago -
नियोजन सभागृहाला मायनाक भंडारी हे नामकरण करत असल्याने रत्नागिरी भंडारी समाज बांधवांनी नितेश राणे यांचे केले अभिनंदन.
By Nilesh Akhade 4 weeks ago -
आम्ही शिवभक्त परिवार, महाराष्ट्र तर्फे रक्षाबंधन सण भारतीय सैन्यासोबत उत्साहात साजरा..
By Nilesh Akhade 4 weeks ago -
-
हर्ष नागवेकर ठरला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट वक्ता 2025
By Nilesh Akhade 1 month ago