रत्नागिरी नगरपरिषद म्हणजे भ्रष्टाचाराचे मुख्य केंद्र नगरपरिषदेला काँग्रेसचे कपिल नागवेकर तर्फे विचारला गेला जाब भ्रष्टाचाराचा केला आरोप.

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषद प्रशासन मोठे भ्रष्टाचाराचे केद्र बनले आहे. शहरातील प्रलंबित कामाबाबत काँग्रेस तर्फे उप मुख्यधिकारी माने साहेब बरोबर चर्चा करण्यात आली.त्यामध्ये नाना नानी पार्क मारुती मंदिर येथील वाढलेले रान असेल किंवा शिवाजी स्टेडियम झालेली दुरवस्था असेल. २००९ पर्यंत शिवाजी स्टेडियम येथे आंतर राज्य रणजी क्रिकेट स्पर्धा सामने खेळले जात होते.तरी सुद्धा जाणीव पूर्वक नवीन कत्राट काढून अनावश्यक खर्च करण्यात येत आहे. स्टेडियमचे देखभाली करण्यासाठी नाहक महिन्याला रक्कम अनाठायी खर्च केला जातो आहे. सध्या तिथे सेक्युरीटी गार्ड ठेवला गेला नाही आहे. त्यामुळे मद्यपीचे वास्तव्य वाढत जाऊन काना कोपऱ्यात बाटल्यांचा खच दिसत आहे. त्यामुळे जनते मध्ये प्रशासन विरोधी असंतोष पसरत आहे. त्वरित ह्या गोष्टीकडे गांभीरपणे लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे सोशल मीडिया विभाग जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर यांनी केली आहे.तसेच नगरपरिषदेच्या ह्या भ्रष्टाचाराला तूर्तास जनते समोर आणले आहे. त्यावेळेस विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन मालवणकर, कल्पना ओसवाल, विकास रेडिज, उत्कर्षा पाटील, युवराज रेवणे सुदेश ओसवाल ,किशोर पाटिल,मोहज्जम खान, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात
Exit mobile version