आंतर विभागीय तायक्वांदो स्पर्धेत सई सावंत हिला कांस्य पदक.

रत्नागिरी – विद्यापीठांच्या आंतर विभागीय तायक्वांदो स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी आणि एस आर के तायक्वांदो क्लबची खेळाडू सई संदेश सावंत हिला ७३ किलो खालील वजनी गटात कांस्य पदक मिळाले.
कणकवली येथील विभागीय स्पर्धेत यशस्वी झाल्यानंतर सई विद्यापीठांच्या आंतर विभागीय तायक्वांदो स्पर्धेत सहभागी झाली होती. माटुंगा इथल्या खालसा कॉलेज इथे १०,११ ऑक्टोबर रोजी या स्पर्धा घेण्यात आल्या. सई संदेश सावंत ही गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रथम वर्ष कला शाखेत शिकत असून महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. विनोद शिंदे आणि एस आर के तायक्वांदो क्लबचे प्रशिक्षक शाहरुख शेख यांचे तिला मार्गदर्शन लाभले. दखल न्यूज महाराष्ट्र

Exit mobile version