आदर्श शिक्षण समिती ,मुंबईतर्फेविद्यार्य्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न..

मुंबई – (प्रमोद तरळ) आदर्श शिक्षण समिती, मुंबई (रजि.) या संस्थेचा
६२ वा गुणगौरव कार्यक्रम व सर्वसाधारण सभेचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. संस्थेचे उपाध्यक्ष अनंत दाभोळकर यांनी प्रास्ताविकपर भाषणात संस्थापक कै. नारायण गोवळकर कै. लक्ष्मण पाटणकर यांच्या संस्था स्थापनेच्या कार्याला वंदन
करून संस्थेच्या आतापर्यतच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. . संस्थेतर्फे देवगड तालुक्यातील सभासदांच्या मुलांना इयत्ता १ ली ते पदवीधर सर्व विद्यार्ध्यांना वह्यांचे वाटप करण्यात आलेले आहे. कुमारी. मनाली शैलेंद्र पाटणकर १० वी उत्तीणे ९४.६० टक्के गुण , कु. हर्ष निलेश पाटणकर १२ वी, उत्तीर्ण ६८.३३ टक्के गुण , कु. श्रेया मंगेश गोवळकर ही M.B.B.S परीक्षा उत्तीर्ण, कुमारी प्रणाली प्रकाश नारकर B.E. ( इलेक्ट्रानिक्स व टेलेकम्युनिकेशन ), कु. अद्वैत हरिष केळकर हा USA-Florida येथुन कमर्शियल वैमानिक तसेच १ ली ते पदवीधर पहिल्या तीन विद्यार्थ्याना पारितोषिके,शिष्यवृत्त्या ,शैक्षणिक वस्तु व पुष्पगुच्छ देऊन पालकांसह सस्थेच्या मान्यवरांकडून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध‌स्थानी सुरेश पवार होते. व्यासपीठावर आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त हरिष केळकर.
कोषाध्यक्ष राजाराम पवार, सरचिटणीस भारत पाटणकर, उपाध्यक्ष अनंत दाभोळकर, सहचिटणीस गोपीनाथ नेवरेकर व स्वप्नील कोतावडेकर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात संस्थेचे विश्वस्त शांताराम गोवळकर व हरीष केळकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे संस्था प्रगतीपथावर आहे. यावेळी राजाराम पवार यांनी ६० हजार रुपये देणगी देऊन याच्या व्याजातुन १०वी व १२ वीच्या प्रथम क्रमाकाच्या विद्यार्थ्याच्या आईवडिलांचा शाल , साडी देऊन दरवर्षी सत्कार करण्यात येणार आहे.यावेळी सत्कारार्थी विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी सहायक आयुक्त हरीष केळकर , कोषाध्यक्ष राजाराम पवार यांचीही समयसुचक भाषणे झाली. दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..
Exit mobile version