राजापूर -(प्रमोद तरळ) तालुक्यातील गोठणे दोनिवडे हे १२ वाडयांचे गाव असून येथील श्री देव सांबेश्वर,श्री देव सोमेश्वर,श्री देव ब्रम्हदेव,श्री देव गांगो व श्री देव चव्हाटा यांची मंदिरे भावीकांसाठी प्रसिद्ध आहेत.येथील रक्षाबंधन (पोवते पौर्णिमा), घटस्थापना, दसरा, त्रिपुरी पौर्णिमा (टिपर), देव दिवाळी, महाशिवरात्र उत्सव व शिमगोत्सव इत्यादी उत्सव व सण बारापाच मानकरी,गावकर गावातील सर्व ग्रामस्थ व मुंबई मंडळाचे कार्यकर्ते एकत्र येऊन साजरे करत असतात.
गावातील राघव घराण्याच्या वंश परंपरेने वडीलोपर्जीत धार्मिक कार्यातील बारापाच मधील प्रमुख मानकरी व गावकर हि जबाबदारी चालत आलेली आहे.
. रविवार दि. ८/१०/२०२३ रोजी श्री देव गांगोदेव मंदिर येथे गोठणे दोनिवडे ग्रामविकास मंडळ मुंबई ने आयोजित केलेल्या गाव सभेत बारापाच मानकरी,सर्व गावकर,सर्व ग्रामस्थ व मंडळाचे आजीमाजी पदाधिकारी, सदस्य, सभासद यांच्या प्रमुख उपस्थितीत “गावप्रमुख” हे मानाचे पद सर्व मानकऱ्यांच्या वतीने श्री विश्वास शंकर राघव यांना देण्यात आले.
. त्यांचे वडील गावकर कै. श्री शंकर केशव राघव हे ३५ वर्षे गोठणे दोनिवडे गावात प्रमुख मानकरी होते त्यानंतर त्यांचे काका मा.श्री हरि गोविंद राघव यांनी २२ वर्षे गावप्रमुख पदावर राहून गावातील सर्व धार्मिक कार्य पार पाडलेली आहेत.आज वयोमर्यादेमुळे त्यांची तब्बेत बरी नसल्यामुळे गावप्रमुख हि जबाबदारी श्री. विश्वास शंकर राघव यांच्यावर आली आहे.
. श्री.विश्वास राघव हे गोठणे दोनिवडे ग्रामविकास मंडळ मुंबई रजि.चे विद्यमान सरचिटणीस असून ते विविध सामाजिक,कार्यात नेहमीच सक्रीय असतात,
. .गोठणे दोनिवडे ग्रामविकास मंडळ मुंबई तसेच सर्व पदाधिकारी, सदस्य, सभासद व सर्व संलग्न मंडळाच्या वतीने श्री. विश्वास शंकर राघव यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत . दखल न्यूज महाराष्ट्र.
गोठणे दोनिवडे गावप्रमुख पदी विश्वास शंकर राघव यांची निवड.
