बातम्या

करजुवे गावचे सुपुत्र संदिप नलावडे यांचा तळेकरीण देवस्थानच्या वतीने विशेष सत्कार संपन्न.

संगमेश्वर :- (प्रमोद तरळ) तालुक्यातील करजुवे गावचे सुपुत्र नॅब शाखा चिपळूणचे जनसंपर्क अधिकारी श्री.संदिप मधुकर नलावडे यांना सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट श्री.वटवॄक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने अक्कलकोट गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यानिमित्त त्यांचा करजुवे तळेकरीण पुरातन मंदिर देवस्थानच्या वतीने देवीच्या शिमगोत्सवाच्या दिवशी प्रमुख मानकरी यांचे हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी गावचे सर्व प्रमुख मानकरी, खोतमंडळी, खूमदार व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.व करजुवे गावासाठी हा मानाचा पुरस्कार असल्याचे सर्वांनी सांगितले.
संदिप नलावडे यांनी ३० वर्षांतील सामाजिक कार्यामध्ये नॅबच्या माध्यमातून मोतीबिंदू शिबीरे तसेच अंधांचे वैवाहिक, व्यवसायिक रोजगार, स्वयंरोजगार आदी कार्य केले आहे.तसेच २०२१ मध्ये चिपळूण शहरात आलेल्या महापुरात पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून ३१ आरोग्य शिबीरे घेऊन औषध व उपचार पुरविले.कोवीड काळात रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागात दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तू व कपडे वाटप केले.या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.तसेच गावातील गोरगरीब वयोवृद्ध व्यक्तींना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून देण्यासाठी संदीप नलावडे हे कायम तत्पर असतात.त्यामुळे गावातील व्यक्तींना ते आपला आधार वाटतात.
या पुरस्काराबद्दल बोलताना ते सांगतात की करजुवे गावची ग्रामदेवता दुर्गादेवी तळेकरीण मातेच्या आशिर्वादाने हे माझे कार्य अविरत सुरू राहणार असून तिच्या आशिर्वादाने हे माझे कार्य मी अजून जोमाने करणार आहे.तळेकरीण देवीवर त्यांची अपार श्रद्धा आहे.वर्षभरातील होणा-या देवीच्या सर्व कार्यक्रमांना आपल्या व्यस्त उपक्रमांमधून वेळ काढत ते हजेरी लावतात.तसेच हा पुरस्कार मला स्वामींनी दिलेला प्रसाद असल्याचे ते सांगतात.

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!