लांजा – (प्रमोद तरळ) अमोल रंगयात्रीचे संस्थापक श्री अमोल रेडीज यांना बुलडाणा फिल्म सोसायटीचा राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार घोषित केला आहे . बुलढाणा फिल्म सोसायटी ही ,फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया मुंबई १४, व राष्ट्रीय फिल्म संग्रहालय पुणे ( भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खाते अंतर्गत) या संस्थांशी संलग्न असून लांजा तालुक्यातील भांबेड या सह्याद्रीच्या खोऱ्यात वसलेल्या गावात राहूनही महाराष्ट्राच्या ६ फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक नट म्हणून केलेली कामगिरी अभिमानास्पद असल्याने तसेच लेखक म्हणून त्यांची तीन नाटके प्रसिद्ध असल्याने व काही एकांकिका व शॉर्ट फिल्म लेखन करून अभिनयही केल्याने त्यांना हा राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार २०२४ सन्मानाने प्रदान करत असल्याचे श्री सुरज वाडेकर यांनी पत्राद्वारे कळवले आहे या मिळालेल्या पुरस्काराबद्दल अमोल रंगयात्री लांजा ,वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ, वेरवली, बल्लाळ गणेश देवस्थान ट्रस्ट, प्रभानवल्ली .नवयुग उत्कर्ष युवक मंडळ, भांबेड. व्यापारी संघटना, भांबेड .विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटना, यांनी व भांबेड पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे, अमोल रेडीज यांनी अजून पर्यंत २६ मराठी व दोन हिंदी सिनेमा अभिनय केला असून हिरकणी, ठाकरे, शिमगा, महाराजा, एका ब्रेकअपची गोष्ट ,चिरंजीव, कुणी घर देता का घर ,साथ सोबत, श्रीदेवी प्रसन्न ,हाक, माझा एल्गार, अशा अनेक सिनेमात काम केले असून घरत गणपती, मानापमान, पुन्हा एकदा, महापरिनिर्वाण, हे त्यांचे आज आगामी सिनेमा आहेत याशिवाय स्नेहबंध, लमान्याचा पोर, वशीकरण ,पुडी ,व्यथा, मस्ती से मिस्टेक, राक्षस या शॉर्ट फिल्म युट्युब वर अमोल रंगयात्री या चॅनेलवर पाहायला मिळतील त्यांची गेम ऑफ डेस्टिनी मुखवटे आणि जिहाद ही गाजलेली नाटके आहे त, त्यापैकी ‘जिहाद’ या नाटकाला झी गौरव पुरस्कार मिळाला आहे अमोल रेडीज यांचा एक कथासंग्रह एक चारोळी संग्रह प्रसिद्ध असून त्यांच्या कविताही लोकप्रिय आहेत अनेक नाटकातही त्यांनी अभिनय केलेला आहे.
- Home
- अमोल रेडीज यांना राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार जाहीर..