सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक अध्यात्मिक आणि आरोग्य क्षेत्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील अग्रेसर आभार संस्था संचलित रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळ महिला शाखेमार्फत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून — महिलांना मार्गदर्शन व विवीध फनीगेम्स– घेवून आगळा वेगळा कार्यक्रम संगीत विशारद मा श्रीमती संध्याताई सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुण्या मा माजीनगराध्यक्षा मा सौ राजेश्वरी शेट्ये मॅडम सौ ऐश्वरा किर सौ नलावडे काकी,सौ वंदना देसाई,सौ इदुलकर मॅडम माजी जि प सदस्या सौ योगीता वाकडे मंडळाचे अध्यक्षा सौ प्रेरणाताई विलणकर,श्री साईनाथजी नागवेकर,श्री शरदजी गोळपकर नमनसम्राट श्री यशवंत वाकडे साहेब आदी मान्यवरांच्या उपस्थितीत
स्वर्गीय मा श्री बाळासाहेब ठाकरे उद्यान उद्यमनगर रत्नागिरी येथे संपन्न झाला यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून श्री प्रविण सावंतदेसाई आणि श्री मुळ्ये यांनी साथसंगत केलेले आणि तुळजा भवानी भजन मंडळ मराठा भवन रत्नागिरी यांनी सादर केलेले सुस्वर आणि सुमधूर ईशस्तवन स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरूवात केली या वेळी सर्व महिला भजन मंडळाचा व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला,भजन क्षेत्रातील कलाकाराना व्यासपीठ देवून आज मार्गदर्शन करताना खूप आनंद होत आहे पण भजन या शब्दाचा अर्थ काय तर जन जनो को भजा हा आहे आपणच देवीच रूप असताना आपण देवळामध्ये का जावे व आपणच एकमेकांना दूषण का देत बसावे आपणच आपले दोष एकमेकांना देत बसतो म्हणजे आपणच देवीच रुप असताना हे असं का होत हे चिंत्तन करावे म्हणजे भजनाचा अर्थ समजणे सोपं होईल —
आभार संस्थेचे उपक्रम हे सर्वानाच प्रेरणादायी असतात गेल्या अनेक वर्षापासून पहाताना या संस्थेने विविध उपक्रम राबविले आहेत व आजही राबवत आहेत आणि आता महाराष्ट्रातील पहिलं महिलांना प्रेरणा देणारे पारंपारीक नमन — अश्या अनेक उपक्रमांना या मंडळाने सर्वच क्षेत्रात केलेल्या उपक्रमाने स्पर्श करणे म्हणजे हेच प्रेरणादायी आहे असे उद्गगार श्रीमती संध्याताई सुर्वे यांनी काढले यावेळी सौ राजेश्वरी शेट्ये सौ ऐश्वर्या कीर कु शमिका पिलणकर व मंडळाच्या अध्यक्षा सौ प्रेरणाताई विलणकर,यांनी आपली मनोगते व्यक्त केली तसेच महिलांसाठी फनी गेम्स स्पर्धा घेवून कार्यक्रमाची रंगत वाढवताना तुळजा भवानी महिला भजन मंडळ मराठा म़ंडळ रत्नागिरी या भजन मंडळांनी स्रिशक्तीगीत गायनाने रंगलेल्या कार्यक्रमाचा रसिक श्रोत्यांचा उत्साह वाढवलेलाच होता तसेच सौ सर्वता चव्हाण आणि सर्वांनी कराओके गायनाचा कार्यक्रम सादर करून सर्वानीच या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ समिक्षा वालम यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ मानसी साळवी सौ वेदा शेट्ये सौ सर्वता चव्हाण सौ पूनम गोळपकर सौ आकांक्षा वायंगणकर,सौ अर्चना मयेकर, सौ शीतल सकपाळ,सौ गीता भागवत तसेच सर्व पदाधिकारी सदस्य यांनी मेहनत घेतली. दखल न्यूज महाराष्ट्र .