बातम्या

जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा मालगुंड येथे होणार संपन्न.

            क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी यांच्या प्रशासकीय, तांत्रिक व आर्थिक सहकार्याने तसेच डॉ. नानासाहेब मयेकर फाउंडेशन मालगुंड यांच्या सहकार्याने  जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट (14 व 17 वर्षाखालील मुले व मुली) स्पर्धेचे कै. डॉ. नानासाहेब मयेकर क्रीडांगण मालगुंड येथे आयोजन करण्यात येत आहे. 14 वर्षाआतील मुले व मुलींसाठी 4 फेब्रुवारी 2025 रोजी तर 17 वर्षाआतील मुले व मुलींसाठी 5 फेब्रुवारी 2025 रोजी कै. डॉ. नानासाहेब मयेकर क्रीडांगण मालगुंड येथे आयोजन करण्यात येणार आहे. अधिक माहितीकरिता टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव सिद्धेश गुरव 8779669496 तसेच क्रीडांगणाचा पत्ता जाणण्यासाठी रुपेश तावडे 9403506737 यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन प्र जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई द्वारा नव्याने मान्यता दिलेल्या खेळांचा क्रीडा स्पर्धा आयोजनास शासकीय योजनांचे लाभ 5% खेळाडू आरक्षण, क्रीडा गुण सवलत, शिष्यवृत्ती, रोग पारितोषिके अनुज्ञेय असणार नाहीत. याची नोंद सर्व खेळाडू क्रीडाशिक्षक पालक यांनी घ्यावी. स्पर्धेत सहभागी घेण्याकरिता विहित नमुन्यातील स्पर्धा प्रवेशिका, खेळाडू ओळखपत्र इ. आवश्यक कागदपत्रांसह स्पर्धा ठिकाणी उपस्थित रहावे.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!