मा. रवींद्रजी चव्हाण साहेब विद्यमान महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष माजी बांधकाम मंत्री यांनी केलेल्या वैयक्तिक स्वनिधीतून तसेच महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ वर्षा परशुराम ढेकणे व स्थानिक भाजप पदाधिकारी यांच्या पुढाकारातून नाचणे रोडवरील सहकार नगर व पावर हाऊस प्रवासी मार्ग निवाऱ्याचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सहकार नगर व नाचणे पावर हाऊस या ठिकाणी प्रवासी बस थांबा शेड नसल्याने लोकांना उन्हामध्ये बसची प्रतीक्षा करत उभे राहावे लागत होते. महिला, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी यांना या शेडमुळे उन्ह- पावसामुळे उभे राहण्यासाठी निवारा शेड भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बांधण्यात आली. या कामाचे स्थानिक लोकांनी कौतुक केले आहे. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे प्रदेश सचिव सौ शिल्पा मराठे , युवा मोर्चा प्रदेश सचिव विक्रम जैन, तालुका अध्यक्ष दक्षिण दादा दळी, तालुका अध्यक्ष उत्तर विवेकजी सुर्वे शहर अध्यक्ष राजनजी फाळके, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संकेतजी कदम, मनोर दळी, भक्ती दळी, निलेश आखाडे, उमेश देसाई, नुपुरा मुळ्ये आधी भाजपा पदाधिकारी व स्थानिक लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहकार नगर व पावर हाऊस येथील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न होताच सर्वांचे तोंड गोड करण्यात आले. व स्थानिकांनी आपल्या कोणत्याही कामासाठी भाजपा पदाधिकारी निलेश आखाडे, राजेंद्र पटवर्धन, प्राजक्ता रूमडे, भक्ती दळी, सायली बेर्डे यांच्याशी संपर्क साधा अशी विनंती उपस्थित नागरीकांना जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली. लोकार्पण सोहळ्यास भाजपचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते व नवलाई नगर, सहकार नगर पावर हाऊस येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
