बातम्या

ईगल तायक्वांदोच्या शिवाज्ञा पवार हिचा सत्कार..

रत्नागिरी – ईगल तायक्वांदो सेंटरमध्ये  प्रशिक्षण घेणाऱ्या शिवाज्ञा शुभम पवार हिचा दामले विद्यालयात सत्कार करण्यात आला. दामले शाळेची विद्यार्थिनी असणारी शिवाज्ञा शुभम पवार ही अभ्युदयनगर बहुउद्देशीय सभागृह येथे संकेता आणि सई संदेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली
या खेळाचे गेले वर्षभर प्रशिक्षण घेत आहे. यात तिने बेल्ट ग्रेडेशन परीक्षा देत येलो बेल्ट ही मिळवला आहे. नुकत्याच चिपळूण इथे झालेल्या जिल्हा अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेत तिने  १४ किलो वजनाखालील पिवी या गटात रौप्यपदक मिळवले. पदार्पणातच तिने या खेळात चमक दाखवणारी कामगिरी केली. यासाठी १५ ऑगस्टचे औचित्य साधत दामले विद्यालयामध्ये तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक भगवान मोटे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिलिंद संसारे,उपाध्यक्षा
कस्तुरी पराडकर, शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य,
वर्गशिक्षिका आरती कांबळे मॅडम यांनी तिचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

What's your reaction?

Related Posts

1 of 297

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!