बातम्या

महाराष्ट्रातील देवाभाऊंसाठी भव्य व उत्कृष्ट राखी प्रदान सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्याचा नाव लौकिक.

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने शनिवारी मुंबई येथे भव्य राखी प्रदान सोहळा उत्साहात व दणक्यात झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ या सोहळ्याला उपस्थित होते.
               कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्रभर झाले. या कार्यक्रमामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने कोकण ठाणे विभागात प्रथम क्रमांक मिळवला तर संपूर्ण राज्यातील ८० संघटनात्मक जिल्ह्यांमध्ये तिसरा क्रमांक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. हा मान मिळवण्यात रत्नागिरी जिल्हा महिला मोर्चा संघटनेचा पूर्ण जिल्ह्यामध्ये राखी संकलनाचे काम जोमात झाले, त्यात रत्नागिरी शहराने विक्रमी संख्येने राख्या जमा करून आघाडी घेतली. तसेच अकरा मंडळातूनही चांगले संकलन झाले. महाराष्ट्र राज्यात रत्नागिरी जिल्ह्याने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. महाराष्ट्रातील भव्य व उत्कृष्ट राखी प्रदान सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्याचा नाव लौकिक मिळविला आहे.  यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष सौ वर्षा ढेकणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
             या यशाचे सर्व श्रेय जिल्हाध्यक्ष राजेश सावंत जिल्ह्यातील प्रत्येक मंडल अध्यक्ष सर्व बुथ प्रमुख व जिल्हा महिला मोर्चाच्या बळकट संघटनेला जाते. जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. वर्षा ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी जोशपूर्ण सहभाग नोंदवला. महिला कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महिलांचे योगदान हेच खरी संघटनेची ताकद आहे महिलांच्या कार्यातूनच संघटना बळकट होत असते असे गौरवोद्गार काढले. महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी यावेळी महिला सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले.

दखल न्यूज महाराष्ट्र

What's your reaction?

Related Posts

1 of 297

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!