दिनांक 21.01.2025 रोजी कोकण विभागाचे कार्यसम्राट आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2024-25 अंतर्गत राजापूर आणि लांजा या तालुक्यातील 35 शाळांना डिजिटल ई लर्निंग इक्विपमेंट (शैक्षणिक साहित्याचे) वाटप लांजा राजापूर विधानसभेचे सन्माननीय आमदार किरण भैया सामंत साहेब यांच्या शुभहस्ते व कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वाटप करण्यात आले याप्रसंगी विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, भाजपा लांजा अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, भाजपा जिल्हा नेते विजय कुरूप, लांजा शहराध्यक्ष गुरुप्रसाद तेली, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अजय गुरव, गटशिक्षणाधिकारी सावंग साहेब, मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष संदेश कांबळे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सचिव महेश पाटकर, मुख्याध्यापक पाटोळे सर, संचालक सचिन भिंगार्डे, बाबा भिंगार्डे, आरडीसी चे संचालक मुन्ना खामकर, लतेश मामा नांदगावकर, आणि अनेक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक बांधव मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.
रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यातील 53 शाळांना कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2024 25 अंतर्गत डिजिटल ई लर्निंग इक्विपमेंट (शैक्षणिक साहित्याचे) वाटप रत्नागिरी जिल्ह्याचे भाजपा अध्यक्ष राजेश सावंत, रत्नागिरी शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, संगमेश्वर मंडळ अध्यक्ष विनोद मस्के, युवा मोर्चा अध्यक्ष संकेत कदम, शहर सरचिटणीस मंदार खेडकर, रत्नागिरी शिक्षण संस्था कमिटीचे सदस्य मनोज पाटणकर, शिर्के प्रशालेच्या मुख्याध्यापिका साखळकर मॅडम, भाजपा जिल्हा आयटी प्रमुख निलेश आखाडे, अहिर सर, विलास कोलेकर सर, विजापूर मॅडम, मामा नांदगावकर, इकबाल पालकर, पडवेकर सर, सुनील पाटील सर, प्रदीप वाघोटे, सर एस पी वाघमारे सर, आरडी जोधवेकर सर, एनजी कोठावडे सर, भावे सर, पुजारी सर, विनोद मस्के सर, आणि अनेक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर बांधव मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र .