मंगळवार दिनांक २७आॅगस्ट२०२४ रोजी भडे ग्रामपंचायत येथे १४आॅगस्ट२०२४रोजी तहकुब झालेली ग्रामसभा दिनांक २७ आॅगस्ट रोजी नियोजित वेळेत सुरू झाली. या सभेत अनेक विषयांवर वादळी चर्चा झाली.त्यानंतर शासन निर्णयानुसार नविन तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी चर्चा झाली.तरी गेल्या वर्षी केलेल्या प्रामाणिक कामाची नोंद घेण्यात आली.तसेच श्री संजय जनार्दन सुर्वे यांनी गेल्या वर्षी त्यांच्याकडे आलेल्या अनेक तक्रारी तंटामुक्त समितीच्या सर्व सहकार्याने /सभासदांच्या माध्यमातून अगदी लिलया हाताळत भडे गावांमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मुळातच वडिलांकडून बाळकडू मिळाले असून, गावातील प्रत्येक नागरीक हा आपल्या घरातील सदस्य मानून प्रत्येकाला समान न्याय देण्याची सवय असल्याने भडे ग्रामपंचायत महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी आवाजी मतदानाने त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे .या निवडीमुळे त्यांना सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छा देण्यात येत आहेत. दखल न्यूज महाराष्ट्र .
- Home
- भडे या गावी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संजय जनार्दन सुर्वे यांची फेरनिवड.