चिपळूण : रखडलेल्या मुंबई – गोवा चौपदरीकरणासाठी महामार्गाच्या मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समिती पुन्हा एकदा येत्या २० मार्च रोजी “आझाद मैदानावर जन आक्रोश आंदोलन करणार आहे. या आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर समितीच्यावतीने अँड.ओवेस पेचकर, समितीचे अध्यक्ष काका कदम यांनी आ.शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची काल भेट घेतली व रखडलेल्या चौपदरीकरणाबाबत अधिवेशनात विषय उपस्थित करावा, अशी मागणी केली. अजित पवार यांची अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भेट घेण्यात आली. रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा, या
मुद्यावर विधानसभेच्या अधिवेशनात सखोल चर्चा व्हावी, यासाठी मागणी करण्यात आली. यावेळी अधिवेशनात लक्षवेधीमध्ये हा विषय चर्चेला घेण्यात येईल व या विषयावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येईल. यासाठी निवेदन देण्यात आले. या बाबत ना. पवार यांनीदेखील तत्काळ दखल घेत चर्चा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जन आक्रोश समितीचे पेचकर, सह कार्याध्यक्ष अनिल काडगे, रूपेश दर्गे, अँड. प्रथमेश रावराणे आदी उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.

▶️100 पेक्षा जास्त ऑपरेशन दुर्बिणीद्वारे यशस्वी..
▶️ऑपरेशनमुळे पेशंट पूर्णपणे रोगमुक्त..
▶️कोणताही त्रास न होता पेशंट लगेच फिरू लागल्याने अत्यंत समाधानी..
▶️ 70 वर्षे वयाच्या वृद्ध आजीचे तोंडाच्या कर्करोगाचे ऑपरेशन होऊन रोगमुक्त झाल्या व आनंदी आयुष्य जगत आहेत.
▶️8 वर्ष मूल नसलेल्या जोडप्याला Ovarian drilling व पुढील उपचारामुळे आपत्यप्राप्ती झाली.
▶️हर्नियाच्या अनेक पेशंटना कोणत्याही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करून खुप फायदा झाला ते समाधानी आहेत.
▶️काही हर्नियाच्या पेशंटचे 3-3 वेळ ऑपरेशन होऊन परत त्रास होऊ लागल्याने दुर्बिणीने ऑपरेशनमुळे व्याधीमुक्त झाले
▶️ गर्भाशयाचा कॅन्सर, ट्युमर यासाठी देखील अनेक शस्त्रक्रिया होऊन पेशंट व्याधीमुक्त झाले.
▶️ बीजकोषाचे ट्युमर सिस्ट यावर उपचार.
▶️ पित्ताशय पित्त खडे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुसऱ्या दिवशी घरी.
▶️ अवघड अपेंडिक्सच्या शस्त्रक्रिया व इतर अनेक स्तानांचा कर्करोग, आतड्यांचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग यावर उपचार शस्त्रक्रिया
▶️ रुग्णांना मोफत सल्ला.
▶️ डॉ. मिहीर चितळे.
चितळे नर्सिंग होम. टिळक आळी रत्नागिरी.
संपर्क : 7263096801.