लेख

गरीब कुटुंबातल्या युवकाचं उत्तुंग यश, संगणक अभियंता याचा प्रवास देतोय प्रेरणा.

एका छोट्याशा गावातल्या गरीब कुटुंबातला युवक कठीण परीक्षेत नेत्र दीप यश संपादन करून उत्तीर्ण होतो आणि त्याच्या गावातील परिसरात चर्चेत येतो, हे खूपच प्रेरणा देणारी घटना आहे.
राकेशचा जन्म ०९ जुलै १९९४ साली मुंबई येथे झाला. आई वडील शिक्षित नसल्यामुळे वडिलांना चांगल्या पगाराची नोकरी नव्हती. त्यामुळे राकेशचे वडील मुंबईत भेटेल ते काम आनंदाने करायचे, मुंबई मध्ये वडिलांच्या छोट्या पगाराच्या नोकरीवर घर व्यवस्थित चालत नसे. तसेच भाड्याचे घर असल्यामुळे अतिशय काटकसरीने घर चालवायला लागत असे, तेव्हा राकेशच्या वडिलांनी मूळ गावी रत्नागिरी जिल्ह्यातील भडकंबा येथे वास्तव करण्याचे ठरविले, तेव्हा राकेशचे बालपण त्याचा मूळ गावी भडकंबा येथेच गेले.
वडिलांना नोकरी नसल्यामुळे त्याचे वडील मजुरी करून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करत होते.त्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावली असायची, त्यामुळे आई व वडील यांनी शेती व्यवसाया बरोबर मोल मजुरी करून कुटुंबाचं संगोपन केलं. त्यामुळे राकेशने शिक्षण घेण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील भडकंबा या एका छोट्याशा खेडे गावातील शेतकरी कुटुंबात राकेशचा जन्म झाला. त्याच बालपण अतिशय खडतर परिस्थितीत गेलं, घरी हालाखीची परिस्थिती असल्याने अनेक खडतर प्रवासाला सामोरे जावे लागत असे. राकेशला इयत्ता पहिली वर्गा मध्ये प्रवेश गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भडकंबा नवालेवाडी या शाळेत प्रवेश घेण्यात आला, राकेशचा शैक्षणिक प्रवाह सुरू झाला. त्यामुळे राकेशचे प्राथमिक शिक्षण भडकंबा नवालेवाडी या शाळेत झाले व माध्यमिक शिक्षण तुकाराम गणशेठ गांधी विद्यालय,साखरपा, रत्नागिरी येथे झाले. राकेश सन २०१० मध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत distinction मिळवून उत्तीर्ण झाला. महाविद्यालयीन शिक्षण केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE Board)या मधून पडवे,राजापूर येथे झाले.

राकेश महाविद्यालयीन शिक्षण केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ,सीबीएसई बोर्ड राजापूर येथील पडवे महाविद्यालयीन महाविद्यालयातून बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाला. राकेश बारावी उत्तीर्ण झाल्या नंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी मुंबईत जायचे असे ठरविले. शिका व कमवा हा आदर्श डोळयासमोर ठेऊन राकेशने नोकरी करून पुढील शिक्षण घ्यायचे ठरविले.
राकेशने घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे व आपली दोन भावंडांचे शिक्षणं चालू असल्यामुळे आई वडिलांवर माझ्या शिक्षणाचा भार नको त्यामुळे पुढील शिक्षण नोकरी करून पूर्ण करण्याचे ठरविले.
उच्च शिक्षणासाठी राकेशला मुंबई सारख्या शहरात जाऊन पुढील शिक्षण घ्यायचे राकेशला वाटत होते.परंतु मुंबईत राहायला प्रश्न कोण सोडवेल असा राकेश विचार करू लागला. तेव्हा राकेशचा मनात विचार आले, आपले नातेवाईक दत्ता कांबळे यांना संपर्क करू मी पुढील शिक्षण घेण्यासाठी मुंबई येत आहे. तुम्ही मला तुमच्या घरी राहायला ठेवाल का? असे राकेशने आपले नातेवाईक यांना विचारले.राकेशने आपले नातेवाईक दत्ता कांबळे यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी मी मुंबई तुमच्या घरी राहण्यास मला परवानगी द्याल का असे विचारले असता, तुझे शिक्षण पूर्ण होई पर्यंत व शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी मिळत नाही तो पर्यंत तू माझ्या घरी राहू शकतोस असे, त्याच्या नातेवाईकांनी त्याला सांगितले.
त्याला शिक्षण घेण्यासाठी, राहण्यासाठी घर व पुढील शिक्षण घेण्यासाठी व कॉलेज करत असताना तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी त्याचे नातेवाईक दत्ता कांबळे यांनी मिळवून दिली होती. राकेशच्या यशात आई वडिलानंतर दत्ता कांबळे यांचे अतिशय बिकट परिस्थितीत सहकार्य लाभले, राकेशच्या जडणघडणीत दत्ता कांबळे यांचे मोठे योगदान आहे.
दत्ता कांबळे यांची परवानगी काढून त्याच्या नालासोपारा येथील घरी वास्तवात राकेश येऊन राहिला. सरकारी शाळा आणि महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी संगणक अभियंता करण्यासाठी मुंबई गाठली,पुढील शिक्षण घेण्यासाठी मुंबई मधील
मुंबई सेंट्रल येतील Navnit Night Degree College मध्ये संगणक अभियंता (Computer Engineering) प्रथम वर्षा करिता प्रवेश घेतला. प्रथम व द्वितीय असे दोन वर्ष त्या रात्र कॉलेज मध्ये राकेशने पूर्ण करून चांगली गुणांनी राकेश उत्तीर्ण झाला होता. राकेश,आपल्या नातेवाईक यांच्या घरी नालासोपारा येथे वास्तव करत होता. जॉब सकाळी ७ वाजता असल्यामुळे सकाळी पहाटे ५ वाजता उठून
जॉबला जायला लागायचे, नालासोपारा ते
मुंबई सेंट्रल येथे यायला दोन तास लागत असे.
जॉब वरून सुटल्यावर नेहमी रात्री कॉलेज जावं लागतं असे, अशा प्रकारे दोन वर्ष जॉब करून दोन वर्षाचा अभ्यासक्रम पुर्ण केला….
तृतीय वर्ष हे महत्वाचे वर्ष आहे, त्यामुळे नोकरीला राजीनामा देऊन,सकाळच नियमित कॉलेज करायचा निर्णय त्यांनी घेतला व दादर येथील कीर्ती एम.डोंगुरसी कॉलेज मध्ये संगणक अभियंता (Computer Engineering) तृतीय वर्षासाठी दुसऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला, नालासोपारा ते दादर नेहमीचा यायचा व जायचा ४तासाचा प्रवास असे,अशा प्रकारे तृतीय वर्षाचा अभ्यास परिस्थितीचे भान ठेऊन तथा खूप मेहनत घेऊन Distinction मिळवून राकेश उत्तीर्ण झाला.
संगणक अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण होऊन मोठ्या पगाराची नोकरी मिळावी,असे अनेक युवकांचं स्वप्न असत, ते स्वप्न प्रत्यक्षात तथा सत्यात उतरविण्यासाठी अनेक तरुण-तरुणी कठोर परिश्रम करतात, दिवसरात्र एक करून अभ्यास करतात, काही तरुण घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील अनेक अडचणींवर मात करून या परीक्षांमध्ये यशस्वी होतात. हेच तरुण समाजासाठी, अन्य तरुणांसाठी प्रेरणादायी असतात. अनेक यशस्वी उदाहरणांमधून संगणक अभियंता राकेश कांबळे हा तरुण त्यापैकीच एक होय. राकेश यांची कहाणी सामान्य तरुणांसाठी, तसेच सर्वच समाजासाठी प्रेरणा देणारी आहे. एका छोट्याशा गावातल्या गरीब कुटुंबातला युवक कठीण परीक्षेत उत्तीर्ण होतो, ही एक यशस्वी तरुणाची सत्य व प्रेरणादायी कहाणी आहे,

जाहिरात


राकेश हा शेतकरी कुटंबात जन्माला आलेला मुलगा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मात करून तीन वर्षाची संगणक अभियंता पदवी distinction घेऊन उत्तीर्ण यशस्वी झाला. राकेशने आपल्या यशाचं पूर्ण श्रेय कुटुंबाला आणि त्याचे शिक्षक, गुरुवर्य, मार्गदर्शक यांना देत असतो.तसेच कठीण परिस्थितीत मला माझे नातेवाईक दत्ता कांबळे यांनी खूप मदत केली असे राकेश आवर्जून सांगतो. शिक्षणासाठी त्यांनी आर्थिक मदत केली होती, पैशाची अडचण असताना त्यांनी राकेशला आपल्या घरात आसरा दिला. राकेशला नोकरी करून पुढील शिक्षण घावे लागेल व संगणक अभियांत्रिकी परीक्षेची तयारी करण्याचा मोलाचा सल्ला दत्ता कांबळे या नातेवाईक यांनी दिला. तसेच संगणक अभियांत्रिकी चे तिसरे वर्ष नोकरी न करता पूर्ण वेळ कॉलेज करून अभ्यास करण्यासाठी वेळ दे. माझे तुला सर्व प्रकारे सहकार्य असेल, तसेच त्यासाठी त्याला प्रोत्साहन देखील दिलं. याचे पूर्ण श्रेय त्याचे नातेवाईक दत्ता कांबळे यांना जाते. बिकट परिस्थितीत राकेशला राहण्यासाठी आपल्या नालासोपारा येथील घरी आसरा दिला. व संगणक अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन बरोबर गरज असेल तेव्हा आर्थिक सहाय्य सुध्दा त्याचे नातेवाईक दत्ता कांबळे यांनी केले होते. तेव्हा राकेशच्या यशात दत्ता कांबळे यांचे मोलाचा वाटा आहे. हे राकेश आवर्जून सांगतो. दर वर्षी लाखो तरुण संगणक अभियांत्रिकी परीक्षा (Computer Engineering Exam) देतात. त्यापैकी काही मोजकेच तरुण या परीक्षेत distinction, घेऊन यशस्वी होतात, मात्र त्यापैकी काही युवकांना हे यश मिळवण्यासाठीचा संघर्ष प्रेरणादायी असतो. राकेश कांबळे यांची कहाणी अशीच आहे, महाराष्ट्रातील, रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी असलेले राकेश कांबळे २०१७ मध्ये संगणक अभियांत्रिकी परीक्षेत नेत्रदीप यश मिळवून यशस्वी झाले, त्यामुळे अतिशय गरीब कुटुंबातला हा तरुण या यशामुळे अचानक प्रकाश झोतात किंवा चर्चेत आला आहे.
रत्नागिरी मधल्या भडकंबे गावात राहणारा राकेश संगणक अभियंता परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं समजल्यावर गावात आनंदाचं वातावरण होतं. राकेशचे अभिनंदन अनेक ग्रामस्थांकडून करण्यात आले होते. राकेशचे हे यश अन्य तरुणांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरलं आहे.
राकेश, सद्या संगणक अभियंता म्हणून आंतरराष्ट्रीय कंपनी मध्ये घवघवीत असा लाखो रुपये पगार असलेल्या कंपनी मध्ये काम करत आहे. चांगल्या पगाराची नोकरी लागल्या नंतर राकेशने पनवेल मध्ये फ्लॅट घ्यायचे ठरविले. भडकंबा गावचे युवा उच्च शिक्षित व्यक्तिमत्व कु.राकेश काशिनाथ कांबळे आज तुझ्या नवीन घराचा गृहप्रवेश, अत्यंत आनंद वाटतोय… राकेश तुझे नवी मुंबईत नवीन घर घेण्याचे स्वप्न साकार झाले, त्या बद्दल तुझे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.
अतिशय आनंद वाटतोय की, अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उच्च शिक्षण घेऊन आज तू यशस्वी झालास. सद्या राकेशने 2BHK आलिशान असा फ्लॅट श्रीमंत वस्ती असलेल्या सोसायटी मध्ये पनवेल,नवी मुंबई या ठिकाणी स्व:कर्तुत्वावर घर घेतले आहे, याचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो. राकेशला आपले करियर घडविण्यास खूप मेहनत करावी लागली. जिद्द,चिकाटी, मेहनत व सातत्य या जोरावर आज राकेशने त्याच्या गावामध्ये तरुण वयातच लाखो रुपयाची नोकरी करून,एवढ्या लहान वयात नवी मुंबई सारख्या शहरात 2BHK आलिशान फ्लॅट घेणारा युवक ठरला आहे. राकेशने अनेक बिकट गोष्टींचा सामना करून त्यावर मात केली आहे. राकेश आज यशस्वी झाला त्याचा मुख्य कारण म्हणजे तो इतर युवक व युवती सारखा सोशल मीडिया वर वेळ वाया घालवत राहिला नाही. म्हणून तरुण पिढीला सांगू इच्छितो की, सोशल मीडियाचा वापर फक्त काम असेल तरच करा. दिवस रात्र सोशल मीडियावर वेळ वाया घालवू नका. तरुण वयात करियर घडविण्यासाठी वेळेचे नियोजन करा व आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी वेळेचे योग्य वापर करा,वेळ कोणासाठी थांबत नसते,याचा गांभीर्याने विचार करून वेळेचा सदउपयोग करा. राकेश सद्या यशस्वी तरुणांमध्ये त्याच्या गावातील परिसरात आघाडीवर आहे. त्याचा आदर्श घेऊन प्रत्येक युवक व युवतींनी घडले पाहिजे.
राकेशचा इथपर्यंतचा प्रवास करणं सोपं नव्हतं, त्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम केले, अनेक सामाजिक-आर्थिक आव्हानांवर मात करत हे यश मिळवलं. बिकट परिस्थितीत वाढलेली काही मुले यशाचं शिखर कसं गाठतात? त्याच जिवंत उदाहरण म्हणजे राकेश कांबळे आहे. आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतात, लहानपणी हालाखीत दिवस काढलेले तरुण पुढे जाऊन मेहनतीच्या जोरावर यशस्वी होतात. आज राकेशने आपल्या गावात यशस्वी तरुणांन मध्ये आपले नाव कमावल आहे, असे अनेक तरुणांना मध्ये चर्चा ऐकायला मिळते. मुंबईत आल्यावर त्याने शिक्षण घेऊन नोकरी करण्यास सुरुवात केली आणि अथक प्रयत्नांतून त्याने हे यश मिळवलं,त्याच्या यशाचे श्रेय तो आपल्या आई वडिलांना देऊ इच्छितो. त्याच्या गावातील युवकानं मध्ये तो यशस्वी युवक म्हणून तो अव्वल ठरला आहे. राकेशला एक भाऊ व एक बहीण आहे, ते दोघे ही सद्या उच्च शिक्षित आहेत.
राकेश तुझ्या या नेत्रदीप यशाला,कार्याला,कर्तुत्वाला, कष्टाला सलाम. तसेच राकेश आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व आपणास पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा….

शिलेश भारती श्रीराम कांबळे (SK) भडकमकर
८४२५०४६४९१.

जाहिरात

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!