बातम्या

काँग्रेसचे दत्ता परकर आले भाजपा नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या भेटीला!

मंत्री महोदयांनी स्थानिक प्रश्न काढला तात्काळ निकाली…

आरवली : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्वाधिक व्यस्त मंत्र्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. कोकणचे नेते म्हणून मिळालेली बिरुदावली सार्थ ठरवताना जवळपास ९ ते १० वेळेस कोकणातून जाणारा, कोकणी माणसाची जीवनदायिनी म्हणून ओळखला जाणारा मुंबई-गोवाt महामार्ग लवकरात लवकर, गुणवत्तापूर्ण तऱ्हेने पूर्ण व्हावा यासाठी कामाचे निरीक्षण करण्यासाठी मोटारीने प्रवास केला. गेल्या ८-९ महिन्यांचा विचार केल्यास इतक्या वेळा या रस्त्यावरून अन्य कोणी मंत्री सोडा पण आमदारांनीही प्रवास केला नसेल.
                आज याच रस्त्याच्या कामाची पहाणी करत असताना आरवली येथील रहिवासी व राष्ट्रीय काँग्रेसचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष श्री. दत्ताजी परकर यांनी मंत्री महोदयांची भेट घेतली. भाजपा संगमेश्वरचे युवा नेते श्री. रूपेश कदम तसेच श्री. विनोद म्हस्के यांच्या पुढाकारामुळे ही भेट शक्य झाली. सध्या तरी या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नसल्याचे समजते. मात्र संगमेश्वर तालुक्यात सध्या भाजपमध्ये होणारे इनकमिंग आणि त्यातही यामध्ये युवा कार्यकर्त्यांचा सहभाग पहाता पुढील काळात बरेच उलटफेर पहावयास मिळण्याची शक्यता आहे. आरवली येथील गणेशोत्सव मंडळाचा प्रश्न घेऊन आलेल्या श्री. परकर यांचे स्वागत खुद्द भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत यांनी केले. यानंतर समस्या समजून घेत ना. रविंद्र चव्हाण यांनी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. यामुळे दत्ताजी परकर यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!