बातम्या

इसवली गुरववाडी ता.लांजा येथे सत्यनारायण महापूजा तसेच विविध कार्यक्रम संपन्न.

लांजा : इसवली गुरववाडी ता.लांजा जि. रत्नागिरी येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी ११ मे २०२५ रोजी सत्यनारायण महापूजा तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांकरिता हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होते अनेक महिलांनी यात सहभाग घेतला. 
         तसेच शिवसेना दादर माहीम विधानसभेचे शिवसैनिक श्री समीर कृष्णा गुरव. यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक साहित्याचे वाटप, तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करून सन्मान करण्यात आला. यावेळी श्री नवलाई एकता मंडळ मुंबई व नवतरुण मित्र मंडळ, इसवली गुरववाडी यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ,मुंबईकर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थितत होते. यावेळी सामाजिक व महत्त्वाच्या कार्यक्रमांना असलेली बांधिलकी जपल्याबद्दल  दोन्ही मंडळाच्या वतीने समीर कृष्णा गुरव. यांचे कौतुक करून आभार मानण्यात आले. असे कार्यक्रम आपल्या हातून वारंवार घडत राहो अशी आई नवलादेवी चरणी प्रार्थना करण्यात आली.

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!