कुडाळ :कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावातील वरची आदोस ते कुडाळ वेंगुर्ला मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता हा अतिशय खराब झाला असून या रस्त्यावरून माणसाला चालणेही अशक्य झाले आहे. एस टी वाहतूक बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत . या संदर्भात तेंडोली गावातील माजी सरपंच मंगेश प्रभू ,भाजपाचे कार्यकर्ते निलेश तेंडुलकर, शिवसेनेचे रामचंद्र राऊळ, ग्रामस्थ संदीप प्रभु ,नारायण राऊळ, वैभव राऊळ या सर्वांनी या संदर्भात पंतप्रधान सडक योजनेच्या कार्यकारी अभियंता भोसले यांची भेट घेतली सदरचा रस्ता हा 2007 साली पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून तयार करण्यात आला होता असे सांगण्यात आले . या रस्त्याची मूळ मालकी ही जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडे आहे रस्ता पूर्ण झाल्यानंतर त्याचे यथायोग्य हस्तांतरण न झाल्याने पुढील काळात या रस्त्यावर कोणत्याही प्रकारची डागडुजी आजपर्यंत झालेली नाही याबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अभियंत्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पंतप्रधान सडक योजनेतून बनवलेला रस्ता हा जिल्हा परिषदेच्या ताब्यात सुस्थितीत देण्यात आलेला नसल्याचे कारण देत सदर रस्त्यावर आम्ही कोणताही खर्च करू शकत नाही असे सांगितले .
यावेळी तेंडोली गावठाण ते मुनगी या रस्त्याचे मुख्यमंत्री सडक योजनेतून पूर्णत्वाकडे नेल्याबद्दल कार्यकारी अभियंता श्री.भोसले व अमोल कोचरेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. सदर रस्त्याचे देखभाल दुरुस्तीचे काम पुढील ५ वर्षे तेच पाहणार आहेत त्यामुळे ५ वर्षापर्यंत रस्ता सुस्थितीत ठेवाव अशी विनंती करण्यात आली जेणेकरून ज़िल्हा परिषद कडे देखभाल दुरुस्ती साठी वर्ग करण्यात अडचण येणार नाही.
मुख्यमंत्री ग्रामसडक कार्यालयाकडून जिल्ह्यातील असे सर्वच रस्ते खराब झाल्याचे सांगण्यात आले . अशा रस्त्यांबाबत ज़िल्हा परिषद कार्यकारी अभियंता यांच्याशी झालेला पत्रव्यवहार मुख्यमंत्री सडक कार्यालयाकडून दाखवण्यात आला . याबाबत तेंडोली ग्रामस्थ यांनी याबाबत आमदार माननीय निलेश राणे यांच्याकडे याबाबत मागणी करण्याचे ठरवण्यात आले असून लवकरच तेंडोली ग्रामस्थ आमदार निलेश राणे यांची भेट घेणार आहेत.