संगमेश्वर : दक्षिण संगमेश्वर तालुका अध्यक्ष श्री. रुपेश कदम व देवरुख शहर अध्यक्ष श्री. सुशांत मुळ्ये यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा अध्यक्ष श्री. राजेशजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान मा. श्री.नरेंद्र भाई मोदी तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रविंद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री. प्रमोद अधटराव यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामीण रुग्णालय बेंच वाटप, गोकुळ संस्थेला अर्थिक मदत, जिजाऊ शिशुवाटीका शाळेला खेळणी वाटप करण्यात आले, दिव्यांग साहस प्रकल्प कार्यशाळा येथे आर्थिक मदत करुन शाळेला मदत केली,
2017 साली केंद्र शासनाने नवीन रुग्णालय उभारणीसाठी सुमारे साडेअकरा कोटी रुपये दिले आणि या निधीतून भव्य असे तीन मजली रुग्णालय उभे राहिले. या रुग्णालयात पायाभूत सुविधांसाठी शासनाने वेळोवेळी निधी दिला आहे. तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी सेवाभावी वृत्तीने काम करीत आहेत. यातूनच आज रुग्णालयाला रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी बेंच देण्यात आले या कार्यक्रमाला महेंद्र आंबेकर, संतोष केदारी ,मुकुंद जोशी ,सादानंद भागवत ,दत्ता नार्वेकर , सितेश परशुराम ,संजू नटे ,अमोल गायकर ,सुधीर यशवंतराव ,विजय गुरव, देवा भाटे, वैभव कदम ,रुपेश भागवत, हेमंत तांबे संजय लिंगायत ,सुरेश गांधी ,पांडुरंग आवळकर ,शंकर मालक, विनोद गायकर ,सुप्रिया मालक दिनेश गुरव ,श्रद्धा इंदूरकर, स्नेहा पाठक ,सुजाता भागवत ,स्नेहल इंदुलकर, मृणाल शेटे ,उमेश दळवी ,प्रशांत विंचू ,पुष्कर शेटे ,प्रमोद शिंदे ,आनंद सार्दळ, संदीप वेळवणकर ,वैभव बने व भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.