विजय शेडमाके
२/१२/२०२३.
गडचिरोली:-गडचिरोली पोलीस दलातर्फे गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणिअति दुर्गम भागातील आदिवासी तरुण युवक-युवतींना स्पर्धेच्या माध्यमातून एक संधी निर्माण व्हावी,तसेच आदिवासी भागात विकास व्हावा यासाठी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने,आदिवासी समाजाच्या विकास व्हावा व सन्मानास्तव नूतन वर्षात भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
या मॅरेथॉन स्पर्धेच्या लोगोचे अनावरण शुक्रवारी दिनांक एक डिसेंबर रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालयात गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या शुभहस्ते लोगोचे अनावरण करण्यात आले. या मॅरेथॉन स्पर्धेच्या लोगोच्या अनावरन शुक्रवारी दिनांक 1 डिसेंबर रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालयात गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या शुभहस्ते लोगोचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता व अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) यतीस देशमुख व इतर अधिकारी उपस्थित होते.
या मॅरेथॉन स्पर्धेत, ३कि.मि,५कि.मि.१०कि.मि.व,२१कि,मि अंतराची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, यामध्ये समाजाच्या सर्व स्तरातून आबाल बुद्धांच्या सुमारे १३ते१५ हजार नागरिकांच्या सहभाग अपेक्षित आहे, गडचिरोली महा मॅरेथॉन २०२३ मध्ये दहा हजार नागरिकांनी सहभाग घेतला होता, स्पर्धेत वेगवेगळ्या वयोगटांसाठी वेगवेगळे अंतर असून विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे,
सहभागी असलेल्या सर्व धावपटूंना किट टी-शर्ट बॅजेस मेडल्स प्रमाणपत्रे इत्यादी देण्यात येणार आहे पोलीस उपविभागीय अधिकारी मयूर भुजबळ हे स्पर्धेची संपूर्ण व्यवस्था पाहत आहेत, तसेच या मॅरेथॉन स्पर्धेची नोंदणी मोफत असणार आहे, त्यामुळे अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गडचिरोली पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे..