बातम्या

भाजपा गडचिरोली शहराच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात विजयी जल्लोष साजरा..

मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा विजयी

विजय शेडमाके
गडचिरोली:- दि.०३ डिसेंबर २०२३ *भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने भाजपने मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजय संपादन केल्याबद्दल स्थानिक इंदिरा गांधी चौकात ढोल ताशांच्या गजरात ठेका धरीत,पेढे वाटून,फटाके फोडुन व गुलाल उधळीत आनंदोत्सव व जल्लोष साजरा करण्यात आला.* *जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,आमदार डॉ. देवरावजी होळी,लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे यांच्या नेतृत्वात जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयी जल्लोष साजरा करण्यात आला.* *यावेळी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके,तालुका अध्यक्ष विलास भांडेकर,जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, माजी जीप सभापती मिनाताई कोडाप,केशव निंबोळ,विनोद देवोजवार,अनिल कुनघाडकर,माजी पं.स.सदस्य हेमंत बोरकुटे,प्रा.अरूण उराडे,येनगंधलवार,वैष्णवी नैताम,पल्लवी बारापात्रे,वछलाबाई मुंघाटे,पुष्पा करकाड़े,देवाजी लाटकर, वासुदेव बटाटे,हर्षल गेडाम,अर्चना निंबोळ,पुनम हेमके,नीता बैस,जोती बागडे बाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!