ग्रा. स. दिवाकर आडविरकरसह ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश….
राजापूर – (प्रमोद तरळ) जैतापूर ग्रामस्थांच्या आग्रहाच्या मागणीनुसार गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मिनी बसस्थानकाचे बांधकाम लवकरच पूर्ण व्हावे म्हणून ग्रामस्थांकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता.
जैतापूर ग्रामपंचायत सदस्य श्री दिवाकर आडविरकर यांनी या संदर्भात नुकतीच मा.विद्या भिलारकर मँडम व श्री निलेश लाहिवाल वास्तू शास्त्रज्ञ यांची मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात भेट घेऊन या विषयावर प्रदीर्घ चर्चा करुन जैतापूर मिनी बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती केली.
सदर बसस्थानकासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद करण्यात आली असून वास्तू आरेखन पूर्ण करून कार्यलयीन मंजुरी नंतर *निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल व
या मिनी बसस्थानकाचे बांधकाम सुरू करण्यात येईल असे ठोक आश्वासन मा.भिलारकर मँडम यांनी श्री आडविरकर यांना दिले असून आपण लवकरच जैतापूरला भेट देणार असल्याचे सांगितले.
या कामी रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालक मंत्री अँड अनिल परब राजापूर लांजा साखरपा आमदार डॉ राजन साळवी जैतापूरचे सुपूत्र मुंबई शाखा क्र.९४ चे शाखाप्रमुख श्री संदीप शिवलकर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच रत्नागिरी एसटी विभागातील कनिष्ठ अभियंता श्री. रूपनार व अनेक अधिकारी यांचे सहकार्य लाभले आहे.