रत्नागिरी : निवळीतील जनता आणि व्यापार संघटनेने रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार मा. नारायण राणेसाहेबांशी पत्रव्यवहार करून निवळीतील उड्डाणपूल रद्द व्हावा आणि निवळीतील बाजारपेठ व व्यापारी यांचे जनजीवन सुरळीत चालावे यासाठी सन्माननीय खासदार राणे साहेबांकडे मागणी केली होती आणि या सर्व कामाचा पाठपुरावा रत्नागिरी अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय निवळकर यांनी वारंवार राणे साहेबांशी संपर्क करून वेळोवेळी पत्रव्यवहार करून याला लवकरच यश मिळावे यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले. त्यांच्या या राणे साहेबांच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्यास यश येताना दिसत असून तसेच निवळी उड्डाणपूल रद्द करण्याची मागणी आणि रावणांगवाडी अंडरपास व तारवेवाडी अंडरपासची मागणी ही 22 ऑक्टोबर 2021 ला केंद्र शासनाकडे करून तसे ठरावही झालेले आहेत आणि तसाच पत्रव्यवहार सर्व ठरावानिशी जुना प्लॅन आणि नवीन प्लॅन तयार करून संबंधित सर्व पत्रव्यवहारही राणेसाहेबांना करून त्याची चर्चा राणे साहेबांच्या वतीने गडकरी साहेबांकडे झालेली आहे. परंतु गेल्या एका आठवड्यामध्ये याच विषयासाठी पालकमंत्री महोदय हे निवळी गावात उपस्थित होतात आणि लोकांसमोर पीडब्ल्यूडी च्या अधिकाऱ्यांना विचारतात कि, उड्डाणपूल रद्द झालेबाबतचे असे काही लेखी पत्र आले आहे का? असे विचारपूस करून ते लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.पालकमंत्र्यांना आता निवळीतील जनतेला नेमके काय भासवायचे आहे. म्हणजे आता उड्डाणपूल रद्द व अंडरपास याबद्दल राणे साहेब नितीनजी गडकरी साहेबांकडे जे बोलले याचा पुरावा द्यायचा का? इतक्या वर्षात निवळी गावात कुठल्या विकास कामांसाठी कधीच न आलेले पालकमंत्री निवळी गावात याच विषयासाठी एका आठवड्यात दोन वेळा आले म्हणजे यांना उड्डाणपूल हवा आहे की नको? याबाबतची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी. सन 2021 पासून लोकांची मागणी असताना सुद्धा आजपर्यंत अंडरपास झालेले नाहीत तसेच रस्ता तयार झालेला नाही याला कारणीभूत कोण? हे सर्व आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे आता आम्ही राणे साहेबांच्या माध्यमातून उड्डाणपूल रद्द व अंडरपास साठी प्रयत्न करत असताना कोणीही मध्ये ढवळाढवळ करू नये अथवा त्याचे क्रेडिट घेण्याचा विचार सुद्धा करू नये आणि चार वर्षात वारंवार मागणी असताना सुद्धा अंडरपास न झाल्यामुळे निवळीतील जनतेची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न कोण करत आहे? हे आता निवळीतील सुज्ञ लोकांना कळतंय त्यामुळे यावर जास्त न बोलता आम्ही आमच्या कामाच्या जोरावर खासदार राणे साहेबांच्या माध्यमातून आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या माध्यमातून नक्कीच निवळीचा उड्डाणपूल रद्द करून तारवेवाडी व रावणांगवाडी दोन्ही अंडरपास मंजूर करून आणू. तूर्तास उड्डाणपुलाचे काम राणे साहेबांच्या माध्यमातून बंद केलेले असून लवकरच तारवेवाडी व रावणांगवाडी दोन्ही अंडरपास चे काम सुरू होईल त्यामुळे याचे श्रेय निवळी वासियांना सहानुभूती दाखवून कोणीही घेण्याचे प्रयत्न करू नये. असे आवाहन संजय निवळकर यांनी केलेले आहे.
- Home
- निवळीतील उड्डाणपूल रद्द व अंडरपास हे राणे साहेबच करू शकतात : संजय निवळकर.