बातम्या

सागवे विभागात बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी बाळासाहेबांसारखे व्यक्तिमत्त्व पून्हा होणे नाही-विजय गोरीवले-ग्रामपंचायत सदस्य दळे.

समिर शिरवडकर -रत्नागिरी.

राजापूर :- ( होळी) :- प्रबोधनकारांचे सुपुत्र, शिवसेना पक्षाचे संस्थापक, दैनिक सामनाचे संपादक, प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि मार्मि मासिकाचे संपादक हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्रीमान वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र – राज्य सचिव समिर शिरवडकर यांच्या नेतृत्वाखाली विभागातील शिवसैनिकांकडून माहिती अधिकार महासंघाचे  कार्यालय होळी स्टॉप येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.मा. विभागप्रमुख,ग्रामपंचायत सदस्य विजय गोरीवले यांनी,बाळासाहेब म्हणजे  “वादळ ” काय होते,यावर प्रकाश टाकला,त्याचप्रमाणे देशाचे रिमोट कंट्रोल म्हणून बाळासाहेबांची ओळख कशी होती यावर युवा नेते प्रसाद मांजरेकर यांनी बाळासाहेबा बद्दल  आपले मनोगत व्यक्त केले,तर मार्मिक आणि बाळासाहेबांची दोस्ती ही कशी आणि कुणाशी …आणि तीही किती ….? यावर सुद्धा समीर शिरवडकर यानी बाळासाहेबां बदद्दल चे आपले मत व्यक्त केले,  जैतापूर सरपंच राजप्रसाद राऊत यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला, समीक्षा शिरवडकर,व अनन्या होळकर यांनी दिपज्योती प्रज्वलित करून आरती केली, यावेळी शिवसैनिक श्रीकृष्ण राऊत, राजस होळकर, संतोष लासे, परेश भाटकर, उदय गिरकर, स्वप्निल सोगम, दिगंबर शिवगण, रघुनाथ म्हादये,सतिश चव्हाण, प्रभाकर खानविलकर,शौणक पावसकर, शशांक पावसकर, सुनील होळकर.आदी शिवसैनिक उपस्थित होते.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!