बातम्या

ग्रुप ग्रा.पं. आंबेड बुद्रुक येथे महिलांचे हळदी कुंकू उत्साहात संपन्न.

संगमेश्वर : ग्रुप ग्रा.पं. आंबेड बुद्रुक येथे महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.  ग्रामपंचायत क्षेत्रातील आंबेड, मानसकोंड, कानरकोंड येथील महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवला. महिलांना आपल्या कामातून, घर-संसारातून थोडासा विरंगुळा मिळावा, आपले बालपण पुन्हा एकदा जगता यावे या हेतूने या विविध स्पर्धा खेळवण्यात आल्या. यावेळी संगीत खुर्ची स्पर्धा, चमचा गोटी आणि मेणबत्ती लावणे इ. खेळांमध्ये महिलांनी हिरीरीने सहभाग नोंदवला. संगीत खुर्ची मध्ये प्रथम क्रमांक सौ. सिद्धी किंजळे तर द्वितीय सौ. संजीवनी गवंडी, चमचा गोटी स्पर्धेमध्ये सौ. दिक्षा फेपडे यांनी प्रथम तर द्वितीय क्रमांक सौ. शुभदा माने व सौ. स्नेहल भोसले यांना विभागून देण्यात आला. मेणबत्ती लावणे स्पर्धेमध्ये सौ. दिक्षा फेपडे यांनी प्रथम क्रमांक तर सौ. प्रमिला मोहिते यांनी द्वितीय क्रमांक संपादन केला.
              गावातील महिलांनी जास्तीत जास्त व्यवसायाकडे वळावे यासाठी महिलांना प्रोत्साहन म्हणून व्यावसायिक महिलांचा/ बचत गटामार्फत विशेष प्रकल्प केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
सौ. शालिनी वरक (दुग्ध व्यवसाय), सौ. भक्ती टाकळे (गांडूळ खत प्रकल्प), सौ. संगीता पांचाळ (हॉटेल व्यवसाय) या महिलांना सन्मानित करण्यात आले. या सर्व कार्यक्रमासाठी गावचे सरपंच श्री. सुहास मायंगडे, उपसरपंच श्री. भाटकर, ग्रामसेविका सौ. संजीवनी गवंडी मॅडम, सदस्य सौ. नुपुरा मुळ्ये, सौ. साक्षी शिगवण, सौ. पूजा मोहिते, सौ. संचिता पाचकले, श्री. राजेश आंबेकर, श्री. सुरेश किंजळे, श्री. कानर, प्रभाग मॅनेजर सौं. रिया मोहिते, सीआरपी सौ. मेघना मोहिते, सौ. दिपश्री किरडवकर, सौ. ममता कानर, उद्योगसखी सौ.अरुणा जाधव, उद्योगवर्धिनी सौ. सरिता आंबेकर, अंगणवाडी सेविका सौ. माने मॅडम आणि सर्व सेविका/मदतनीस, आशासेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, सर्व ग्रामस्थ महिला आदींचे उत्तम सहकार्य मिळाले. दखल न्यूज महाराष्ट्र 

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!